व्हिडिओ : यमला पगला दिवाना फिर से मधील 'राफ्ता राफ्ता' गाणे सोशल मीडियावर हिट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धमेंद्र पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Updated: Aug 28, 2018, 02:06 PM IST
व्हिडिओ : यमला पगला दिवाना फिर से मधील 'राफ्ता राफ्ता' गाणे सोशल मीडियावर हिट title=

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धमेंद्र पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'यमला पगला दिवाना' या सिनेमातून अनेक वर्षांनंतर ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता पुन्हा एकदा धमेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल तिघे मिळून 'यमला पगला दिवाना फिर से' या सिनेमात झळकणार आहेत.

या सिनेमाती एक दमदार गाणे प्रदर्शित झाले असून ते सोशल मीडियावर हिट होत आहे. राफ्ता राफ्ता असे या गाण्याचे बोल असून यात विविध गाण्यांचे मिश्रण आहे. गाण्यात धमेंद्र, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, रेखा थिरकताना दिसत आहेत. त्यानंतर सनी-बॉबीची ही खास एंट्री आहे. गाण्याचे बोल ठेका धरायला लावणारे असून यात सर्व कलाकारांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेते शत्रुघ्न सिन्हांचीही एक झलक यात पाहायला मिळते. या सर्व लोकप्रिय कलाकारांचे एकाच गाण्यात एकत्र सादरीकरण हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरत आहे. 

तुम्हीही पाहा हे हिट गाणे...