लतादीदींचे हे फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील

आठवणीत असलेल्या लतादीदी...  

Updated: Feb 6, 2022, 04:04 PM IST
लतादीदींचे हे फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील title=

मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते. पण आज अखेर 29 दिवसांची झुंज संपली आहे. निधनानंतर लतादीदींचे काधीही न पाहिलेले फोटो सोमोर आले आहेत. 

लहानपणी वडिलांचं निधन झाल्यानंतर लतादीदींनी अभिनेय क्षेत्रात छोट्या भूमिका  साकारण्यास सुरूवात केली. त्यांना अभिनय, मेकअप कधीच आवडला नाही. पण कुटुंबासाठी त्यांनी अभिनय केला. त्यांना कायम गायिकाचं व्हायचं होतं.

 
लतादीदींनी त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्या कधी मागे हटल्या नाही. दीदींनी 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक गाणी स्वरबद्ध केली आहेत.  आज देखील त्यांची गाणी तितकीचं प्रसिद्ध आहे. 

'मजबूर' चित्रपटातील गाणी ऐकल्यानंतर कमाल अमरोही यांना त्यांच्या 'महल' सिनेमाना गाण्याची संधी दिली. फोटोमध्ये लतादीदी एसडी बर्मनसोबत दिसत आहेत. 

'ऐ मेरे वतन के लोगो' हे गाणं ऐकल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं. लातादीदींचं हे गाणं आजही प्रसिद्ध आहे. 

लतादीदींना 1989 मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' आणि 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देण्यात आला.

लतादीदींचे अनेक फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होता आहेत. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

दिलीप कुमार यांना राखी बांधताना दीदींचा फोटो अत्यंत भावुक करणारा आहे. 

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.