Armaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral

Armaan Malik Youtube Video :  यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. या दोघांचा डोहाळे जेवण्याआधी पाहुण्यासमोर राडा झाला. त्यानंतर अरमान मलिकने दोघींच्या कानाखाली मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. 

Updated: Feb 22, 2023, 01:40 PM IST
Armaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral title=
You Tuber armaan malik slap pregnant Wife payal kritika Before Baby Shower video viral on Social media trending now

Armaan Malik Wives Fight : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik)  हा काही दिवसांपूर्वी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. तो सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे. तो एक युट्यूबर असून त्याचे लाखो फॉलव्हर्स आहेत. तुमच्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Armaan Malik Video) झाला होता. दोन गर्भवती बायका असतोनाही तो तिसरी बायको घेऊन घरी आला होता. पण यावेळी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  (Armaan Malik Viral Video)  झाला आहे. ज्यामध्ये तो गर्भवती पत्नींवर हात उचलतो. या घटनेनंतर अरमान मलिक आणि त्याचा दोन बायका पुन्हा एकादा इंटरनेटवर चर्चेत आहे. (You Tuber armaan malik slap pregnant Wife payal kritika Before Baby Shower video viral on Social media trending now)

अन् त्याने दोघींना कानाखाली मारली (Armaan Malik Youtube)

या दोघींसाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. घरामध्ये भरपूर पाहुणे आले होते. सगळीकडे सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरु होती. अशातच मलिकच्या दोन्ही बायकांमध्ये तूतू मैंमैं झाली. कृतिका आणि पायलमध्ये तयार होण्यावरुन भांडण होतं. त्यांचं हे भांड पाहून कृतिकाच्या आई मध्यस्थी करायला येते पण त्या दोघी काही थांबत नाही. पायल रागाने तिचा स्कार्फ कृतिकासमोर फेकून देते...तेवढ्यात अरमान तिथे येतो...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

आणि हे काय...

अरमानला काय घडलं त्याबद्दल सांगितलं जातं. त्याचा राग अनावर होतो आणि तो दोघींवरही हात उचलतो. हे पाहून कुटुंबातील उपस्थित सदस्यांना धक्काच बसतो. गर्भवती महिलेवर असा हात उचलणे योग्य नाही. सोहळ्या पूर्वी झालेल्या भांडण्यामुळे घरातील आनंदाचं वातावरण खराब झालं.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

युट्युबवर अरमान मलिकच्या बायकांमधील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओमध्ये पायल कृतिका भांडत असताना अरमान येतो आणि दोघांवर जोरात ओरडतो. व्हिडिओमध्ये अरमान मलिक गर्भवती पत्नींवर हात उचलताना दिसत आहे. सरतेशेवटी, YouTuber कुटुंब जगाला सांगते की ही सर्व एक नाटक आहे म्हणून...

डोहाळ जेवण थाट्यामाट्या संपन्न

अरमान मलिकच्या पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिक यांचं डोहाळे जेवण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आलं. या क्षणाचे अनेक व्हिडीओ अरमान मलिकने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

हे व्हिडीओ पाहून हा सोहळ्या खूप खास आणि भव्य करण्यात आला होता. दोन बायका आणि त्याही एकत्र गर्भवती यामुळे सोशल मीडियावर अरमान प्रसिद्ध आहे. तो प्रत्येक क्षणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.