Youtuber Armaan Malik : एक नवरा, दोन बायका, दोघींकडेही एकाचवेळी Good News

Youtuber Armaan Malik : यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकने (Armaan Malik) दोन लग्न केली असून अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. मात्र या दोघींही आता Good News देण्याच्या तयारीत आहे.   

Updated: Dec 11, 2022, 01:20 PM IST
Youtuber Armaan Malik : एक नवरा, दोन बायका, दोघींकडेही एकाचवेळी Good News title=
YouTuber Armaan Malik Reveals His Two Wives Are Pregnant latest marathi news

Armaan Malik Wifes Pregnant :  गेल्या काही दिवसात एकाच मांडवात तरुणानं दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं. त्यानंतर लग्नाचे फोटो, आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले. पण हा विवाह नवरदेवाच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. त्याच्याविरोधात अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पण या प्रकरणानंतर अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यात एका लोकप्रिय युट्यूबरचाही समावेश आहे. एक नवरा आणि दोन बायका आणि एक मुलगा असं त्याचं कुटुंब आहे.  

या प्रसिद्ध यूट्यूबरचे (Youtuber) अरमान मलिक (Armaan Malik) नाव असून सोशल मीडियावर (Social media) अरमानचे अनेक चाहते आहेत. अरमान मलिकने दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अरमान त्याच्या पत्नींसोबतचे व्लॉग आणि व्हिडीओ युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलवर्स आहेत. अलीकडे, व्लॉगरने इंस्टाग्रामवर आपल्या पत्नींचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांचे बेबी बंप (Baby bump) दिसत आहेत. 

हैदराबादचा यूट्यूबर अरमान मलिक पर्सनल लाईफमुळे अरमान अनेक वेळा चर्चेत असतो. त्यातच यूट्यूबर अरमान मलिकच्या (Armaan Malik)  दोन्हीही पत्नी एकाच वेळी प्रेग्नेंट आहेत. अरमान मलिकने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. हे फोटो पोस्ट करत अरमान मलिकने तो बाबा होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. अरमानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या दोन्ही प्रेग्नेंट गर्भवती असल्याचं दिसत आहे. अरमानच्या दोन्ही पत्नी बेबी बंप फ्लॉन्ट (Flaunt the baby bump) करताना दिसत आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांकडून अरमाना ट्रोल केलं जातं आहे.

वाचा : आयपीएलच्या पुढील हंगामाशी संबंधित एक बातमी चाहत्यांना निराश करू शकते  

सोशल मीडियावर अरमान झाला ट्रोल

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अरमान मलिक आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी अरमानची खिल्ली उडवत कमेंट केल्या आहेत. एक युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, 'तुम्हा दोघांना एकच माणूस मिळाला.' तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, 'तुमची मजा आहे'. तर एकाने लिहले आहे, “या मुली नेमक्या कोण आहेत ज्या एक पती शेअर करत आहेत?” तर दुसऱ्याने लिहले आहे, “एकाच वेळी दोन्ही बायका गरोदर?” तर आणखीन एकाने लिहले आहे, “तुम्ही लोकांनी थोडी तरी शरम ठेवावी,” अशा शब्दात नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

अरमान मलिकच्या दोन्ही बायका गरोदर

यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन बायका पायल मलिक (Payal Malik) आणि कृतिका मलिक (Krutika Malik) या कंटेट क्रिएटर आहेत. अरमान आणि पायलला एक मुलगा आहे. आता अरमानच्या दोन्ही बायका एकत्र गरोदर आहेत. अरमानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन्ही पत्नी गरोदर असल्याची घोषणा केली. त्याने इंस्टाग्रामवर दोन्ही पत्नींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अरमानच्या दोन्ही बायका त्यांचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अरमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'माझं कुटुंब.'

कोण आहे अरमान मलिक?

अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. अरमान युट्यूब (YouTube) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.