घरोघरी मातीच्या चुली...., पतीच्या निधनानंतर सासूकडून अभिनेत्रीचा छळ !

बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या अभिनेत्रीचा सासूकडून छळ, पतीच्या निधनानंतर मुले देखील...  

Updated: Aug 3, 2022, 10:24 AM IST
घरोघरी मातीच्या चुली...., पतीच्या निधनानंतर सासूकडून अभिनेत्रीचा छळ ! title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले, पण ज्या कलाकारांना चाहंत्यांनी प्रेम दिलं, त्यांच्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या झीनत अमान यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अपयश मिळालं, पण प्रोफेशनल आयुष्यात मात्र त्यांचा हात कोणी पकडू शकत नव्हतं. 'धरमवीर', 'सत्यम शिवम सुंदरम', 'डॉन', 'हरे रामा हरे कृष्णा' यांसारख्या सिनेमांतून यशाचा झेंडा रोवणाऱ्या झीनत अमानच्या आयुष्यातील अनपेक्षित पैलूंबद्दल आज जाणून घेऊ.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झीनत यांचं लग्न यशस्वी ठरलं नाही. अभिनेत्रीने निर्माता आणि अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न केलं, परंतु झीनत यांनी लग्नानंतर आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले.

एकदा एका चॅट शोमध्ये झीनत यांनी स्वतःच्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलेपणाने सांगितले. झीनत यांनी सांगितले होते की, लग्नानंतर माझं सिनेमांमध्ये काम करणं मजहरला मान्य नव्हतं. याच कारणामुळे अनेकदा त्यांच्यामध्ये वाद देखील झाले.  

चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची पतीच्या मृत्यूनंतर दुर्दशा; पाहून डोळे पाणावतील

दोघांमध्ये वाद सुरु असतानाच 1993 मध्ये झीनतला मजहरच्या गंभीर आजार झाल्याचे निदान झालं. त्यानंतर 1997 पर्यंत मजहरच्या आजारावर उपचार सुरु होते. पण अनेक वर्ष प्रयत्न करुनही मजहरचं त्या गंभीर आजारामुळे निधन झालं. 

पतीच्या निधनानंतरही झीनत यांचा त्रास कमी झाला नाही. पतीच्या निधनानंतर झीनत यांच्या सासूने अभिनेत्रीचा छळ करण्याची सुरुवात केल्याचं समोर आलं. एवढंच नाही झीनत यांच्या मुलांना देखील आईबद्दल अनेक वाईट गोष्टी सासूने सांगितल्या.

पण आनंदाची गोष्ट म्हणजे असं असूनही झीनत यांनी मुले त्यांच्यापासून दूर झाली नाही. त्यांनी कायम आईची साथ दिली. झीनत यांनी त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आज अनेक वर्षांनंतर देखील त्या त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत आहे.