Belly fat कमी करायचंय? मग किचनधील हा मसाला करणार तुमची मदत!

शरीराच्या वाढत्या वजनाने त्रस्त असलेले लोक जिममध्ये जाण्यापासून ते जॉगिंगपर्यंत अनेक प्रयत्न करतात

Updated: Oct 9, 2022, 07:19 AM IST
Belly fat कमी करायचंय? मग किचनधील हा मसाला करणार तुमची मदत! title=

मुंबई : चुकीची जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा मोठी समस्या बनलीये. शरीराच्या वाढत्या वजनाने त्रस्त असलेले लोक जिममध्ये जाण्यापासून ते जॉगिंगपर्यंत अनेक प्रयत्न करतात, पण तरीही त्यांचा लठ्ठपणा कमी होत नाही. 

जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला मसाल्यांशी संबंधित वजन कमी करण्यासाठी एक उपाय सांगत आहोत. या उपायाने तुमच्या पोटाची चरबी तर दूर होईलच पण तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तही राहाल. 

दालचिनीचा वापर

दालचिनी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. तुम्ही दालचिनी बारीक करून चहामध्ये तुळशीची पानं, काळी मिरी आणि आलं मिसळून प्या. हा चहा प्यायल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होईल आणि तुमचा फिटनेस देखील सुधारेल.

जर तुम्हाला सर्दी, ताप किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर एका ग्लास पाण्यात दालचिनी टाकून गरम करा. नंतर थंड होऊ द्या आणि हे पाणी प्या. हा उपाय तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करेल आणि तुम्हाला आजारांपासून संरक्षण देईल. 

दालचिनीच्या सेवनाने चयापचय क्रिया देखील मजबूत होण्यास मदत होते. जी पोटाची चरबी आणि शरीरातील चरबी कमी करण्यात खूप मदत करते. दालचिनीशी संबंधित हे उपाय 12 आठवडे सतत करावे. त्यानंतर त्याचे चमत्कारिक परिणाम दिसून येतात.