केसगळतीवर कढीपत्ता आहे गुणकारी

 कढीपत्त्यात असलेले अॅमनो अॅसिड आणि अँण्टी ऑक्सिडेंट्स केस मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर असतात.

Updated: May 15, 2018, 01:27 PM IST
केसगळतीवर कढीपत्ता आहे गुणकारी title=

मुंबई: पदार्थांचा स्वाद वाढवणे इतकाच काय तो कढीपत्त्याचा उपयोग आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल कदाचित. पण, पदार्थांचा स्वाद वाढविण्यासोबतच कढीपत्त्याचा दुसराही महत्त्वाचा गुणधर्म आहे. कढीपत्त्यात प्रोटीन आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक डोक्याची केसगळती कमी करण्यासाठी महत्त्वाचे असतात. तसेच, कढीपत्त्यात असलेले अॅमनो अॅसिड आणि अँण्टी ऑक्सिडेंट्स केस मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच आज आम्ही आपल्याला सांगत आहोत कढीपत्त्याचे खास औषधी गुणधर्म...

पांढऱ्या केसांवर गुणकारी

कढीपत्त्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्परस तसेच, अनेक प्रकारची जिवनसत्त्वे कढिपत्त्यात असतात. कढीपत्त्याचे हे गुण पांढऱ्या केसांवर गुणकारी ठरू शकतात.

लांब केसांसाठी 

बाजारात केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हेअर प्रॉडोक्ट्स आहेत. पण, हे प्रॉडोक्ट्स केमिकलयुक्त असल्यामुळे त्याचा तात्पूरता फायदेशीर परिणाम दिसतो. पण, तुम्हाला त्याचा दीर्घकाळ त्रासच संभवतो. अशा स्थितीत कढीपत्ता तुमच्या मदतीला येऊ शकतो. कढीपत्त्यातील प्रोटीन्स तुमचे केस लांब होण्यासाठी आणि गतीने वाढण्यासाठी फायदेशिर ठरू शकतात.

केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर

कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी असते. व्हिटॅमीन बी हे केसगळती थांबविण्यासाठी फायदेशीर ठरते. केसांना नैसर्गिक आणि चमकदार रंग प्राप्त करण्यासाठीही कढीपत्ता फायदेशीर ठरतो.

दरम्यान, केसातील बुरशी, डॅण्ड्रप, रखरखीतपणा यावरही कढीपत्ता गुणकारी असतो.