मुंबई : गरोदरपणाचा काळ जितका महत्त्वाचा असतो तितकीच काळजी प्रसुतीनंतरही घेणं आवश्यक आहे. प्रसुतीनंतर बाळ किमान एक दीड वर्ष आईच्या दूधावर अवलंबून असते. अशावेळेस आईच्या आहारात असलेले पदार्थ बाळावर परिणाम करते. त्यांच्यांमध्ये इंफेक्शन वाढवू शकते. म्हणूनच आईच्या आहारात कोणते पदार्थ असावेत याबाबतचा काळजी घेणं आवश्यक आहे. बाळाला स्तनपानाने दूध किती वर्ष द्यावे
स्तनपान करणार्या महिलांनी या काळात आंबट फळं खाऊ नये. यामधील व्हिटॅमिन घटक लहान मुलांचं पोट बिघडवण्यास मदत करते.
स्तनपान देणार्या महिलांनी लसणाचा आहारातील समावेश टाळावा. लसणामुळे दूधाचा स्वाद बिघडतो. परिणामी मुलं दूध पिणं नाकारू शकतात. आईच्या आहारात एखाद्या उग्र वासाच्या पदार्थांचा समावेश असल्यास बाळं दूध नाकारू शकते.
मिरची, दालचिनी, काळामिरी यांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. परिणामी मुलांमध्येही पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
अल्कोहलच्या सेवनापासून दूर रहा. यामुळे रक्तात अल्कोहलचे प्रमाण वाढू शकते. याचा परिणाम लहान मुलांवरदेखील होऊ शकतो.
महिलांच्या आहारातून कोबी, मटार, काकडी यांचा समावेश टाळा. यामुळे पोटात गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता असा त्रास होऊ शकतो.
स्तनपानादरम्यान महिलांनी कॉफीपासून दूर रहावे. कॉफीत कॅफिन घटक अधिक प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो. बाळाची झोप यामुळे बिघडू शकते. कॅफिन घटक हे चहा आणि सोड्यातही असतात.