Video : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध...

Dough Kept In Fridge : तुम्ही सकाळी घाई होऊ नये म्हणून चपात्यांसाठी कणीक रात्रीच भिजवून ठेवता का? मग तज्ज्ञ काय सांगतात पाहा तुमच्याच डोळ्याने... 

नेहा चौधरी | Updated: May 23, 2023, 07:02 AM IST
Video : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध... title=
chapati eaten from dough keeping fridge is harmful to health says experts video in Instagram

Dough Kept In Fridge : आज प्रत्येक जण घरात कामावर जातं. त्यामुळे महिलांची सकाळी सकाळी डब्याची घाई असते. कोणाला नाश्ता हवा असतो, तर कोणाला शाळे, ऑफिसला जायची घाई असते. अगदी तीची सुद्धा ऑफिसची वेळ होत असते. अशावेळी टाइम मॅनेजमेंट म्हणून ती सकाळी घाई होऊ नये म्हणून सकाळच्या नाश्तापासून डब्याची तयारी रात्रीच करुन ठेवते. अगदी कणीकही भिजवून फ्रिजमध्ये ठेवते. म्हणजे सकाळी लगचेच गरमा गरम चपाती कराता येईल आणि घाई पण होणार नाही. 

पण थांबा तुम्ही आरोग्यासोबत खेळत आहात!

पण तुमची ही सवय तुमच्या आणि तुमच्या घरच्यांचा आरोग्यासोबत खेळ होतो आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान होतं असं तज्ज्ञ सांगत आहेत. नेमका काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात...

फ्रिजमध्ये जास्त काळ पीठ ठेवल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते, ते तुमच्या शरीरावर स्लो पॉयझन काम करतो असं, डॉ. मनोज मित्तल यांचं म्हणं आहे. त्याशिवाय आयुर्वेदातही फ्रिजमधील कणीक वापरल्याने आरोग्याला हानी पोहोचते असं सांगण्यात आलं आहे. एक वेळी शिळी पोळी खाल्ली तर हरकत नाही. तज्ज्ञांच्या मते चपाती साठी नेहमी वेळेवरच कणीक मळून घ्यायला हवी. ताज्या कणकेच्या पोळ्या या शरीरासाठी योग्य असतात. 

तज्ज्ञांनुसार जास्त काळ मळून फ्रिजमध्ये ठेवलेली कणीकमधील सर्व आवश्यक ती पोषक तत्वे नाहीशी होतात. त्यामुळे खोट दुखी, फोट फुगी शिवाय अँसिडिटीची पण समस्या जाणवते. वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे असे शिळे जेवण जेवणारी व्यक्ती ही नेहमीच वेगवेगळ्या रोगाने बाधित राहाते असं सांगण्यात आलं आहे. (chapati eaten from dough keeping fridge is harmful to health says experts video in Instagram)

आरोग्यासाठी कसे ठरते नुकसानदायी?

पोटात गॅस आणि अॅसिडिटी तुम्ही निमंत्रण देतात. बद्धकोष्ठतेसारख्या तुम्हाला जाणवतात. डॉ. मनोज यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला सांधेदुखीचे आणि कमरदुखी त्रास होतो. हार्ट ब्लॉकेजची समस्यादेखील उद्भवू शकते. लहान मुलांच्या स्मरणशक्तीवरही याचा परिणाम होतो. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकासाठी फ्रिजमधील कणिकची चपाती ही हानीकारक आहे. लँग्स आणि किडनीची समस्यादेखील होते, असं डॉक्टर या व्हिडीओमध्ये सांगत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, त्यामुळे आजच फ्रिजमधील पिठाच्या चपात्या खाणं बंद करा. 

डॉ. मनोज मित्तल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर healthknowledgeindia's या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)