कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी करा 'या' उपाययोजना

 योग्य वेळी या आजाराची माहिती तसेच उपाययोजना गरजेच्या आहेत.

Updated: Apr 9, 2020, 04:56 PM IST
कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी करा 'या' उपाययोजना  title=

मुंबई : कोविड-19 हा व्हायरस किंवा विषाणूजन्य आजार आहे. तो श्वसनमार्गाला होतो. जगभरात या आजाराच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतोय. या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. या अनुषंगाने कोरोना व्हायरस हा विकाराची लागण आणि मृत्यू रोखण्यासाठी योग्य वेळी या आजाराची माहिती तसेच उपाययोजना डॉ. मजूषा यांनी सांगितल्या आहेत.

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे, याकरता देशभर संपूर्ण लॉकडाऊन, सामाजिक दुरावा, शारीरिक स्वच्छता आणि चेहऱ्यावर मास्क लावूनच या आजाराशी यशस्वी झुंज देता येऊ शकते. घराबाहेर न पडणे या आजाराशी मुकाबला करण्यास मदत करतेय. 

मुळात, युद्ध आघाडीसाठी सैनिक तयार करण्यासाठी ‘प्रीहेबिलिटेशन’ ही एक दुसऱ्या महायुद्धांमध्ये प्रचलित झालेला शब्द आहे. पुनर्वसन एका एक बहुआयामी दृष्टीकोन आहे आणि त्यात पोषण, स्वच्छता, करमणूक, शारीरिक प्रशिक्षण आणि व्यायाम यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीनुसार, प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय परिस्थितीनुसार शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. यासाठी घरात राहूनच लोकांना जितके शक्य आहे तितकं काम केले पाहिजे. जसे, घरातील साफसफाई, धुळ, मोपिंग, बागकाम अशा घरगुती कामांमध्ये व्यस्त राहिल्यास शारीरिक हालचाली तर होईलच, याशिवाय वजनही नियंत्रणात राहिलं.  

आजाराची लागण रोखण्यासाठी हे करा...

नियमित कामाव्यतिरिक्त शारीरिक व्यायामही करणे गरजेचं आहे. जसे, सुर्यनमस्कार, स्टेचिंग एक्ससाईज, प्राणायाम, श्वासोच्छावास नियंत्रणात ठेवणारे योगा प्रकार, वज्रासन इत्यादी.

घरात राहून मानसिक तणाव येऊ नये, म्हणून ध्यानसाधना करणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत मिळते. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोनापासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो.

संचारबंदीच्या कालावधीत रोजच्या आहारासाठी विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

तेलकट, मसालेदार पदार्थ आणि शीतपेयांचे सेवन करणे शक्यता टाळावेत.

शरीराला जास्त प्रमाणात प्रथिने मिळतील याची काळजी घ्या

जेवणात प्रथिनेयुक्त आहार घ्या

शाकाहारी डाळ, शेंगदाणे, कोंबडी मटार, रजमा यांची निवड करू शकता

पनीर, चीज, दुध, दही, ताक, मांसाहार करणारे अंडी/मासे/कोंबडी निवडू शकतात

फळ, ड्रायफुड्स यांचेही नियमित सेवन करावेत.

हळद/ दालचिनी/ लसून आणि आले पावडर किंवा मूळ स्वरूपात आपल्या सेवन करणाऱ्या मसाल्यांमध्ये बदल करा.

पिण्याचे अधिकाधिक सेवन करावेत

कोरोना विषाणूचा सर्वांधिक प्रभाव फुफ्फुसावर पडतो. त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता चांगली रहावी यासाठी धुम्रपानाचे सेवन करणे टाळावेत

कुठल्याही आजारांवर नियमित औषध सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती बंद करू नयेत

संचारबंदीच्या या कालावधीत मिळालेल्या मोकळ्या संधीचा फायदा करून घ्या...घरबसल्या पुस्तक वाचा, मित्रांशी फोनवर गप्पा मारा, जुने चित्रपट पहा इत्यादी.