गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या इतक्या रूग्णांची नोंद; 26 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ

देशात रूग्ण ठीक होण्याची संख्या 98.74 टक्के इतकी आहे.

Updated: May 11, 2022, 01:33 PM IST
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या इतक्या रूग्णांची नोंद; 26 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ title=

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. गेल्या 24 तासांच्या आत 2897 नवे कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. शिवाय 54 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचं समोर आलं आहे. देशात एकाच दिवसात कोरोनाची 2897 प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असून हा आकडा 19, 494 इतका आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दरम्यान देशात रूग्ण ठीक होण्याची संख्या 98.74 टक्के इतकी आहे. आतापर्यंत देशात 4,25,66,935 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे लसीकरण मोहीमेअंतर्गत एकूण 190.67 कोटींपेक्षा अधिक लोकांना डोस देण्यात आले आहेत. दरम्यान मंगळवारच्या तुलनेत 26 टक्क्यांनी रूग्णसंख्या वाढली आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाच्या स्थितीसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. 

ते पुढे म्हणाले की, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी काही प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील असा अनुमान काढला गेला.