मुंबई : एका वर्षापासून जगभरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. अशा परिस्थितीत, तज्ञ त्यापासून बचाव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधांविषयी सतत सल्ला व इशारे देत असतात. असाच एक इशारा आता दिल्ली स्थित एम्सच्या तज्ज्ञांनी दिला आहे. या तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना-संक्रमित रूग्ण जे घरी क्वारंटाईन आहेत त्यांनी उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे घेऊ नये.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संसर्ग झाल्यास रुग्णाची ऑक्सिजन लेवल 94 च्या खाली गेली तर त्यांनी कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करावे.
तज्ञांनी वेबिनार दरम्यान याची शिफारस केली आहे. हे वेबिनार कोरोना रूग्णांसाठी 'होम क्वारंटाईन असलेल्यांसाठी औषध आणि काळजी' या विषयावर होते. या वेबिनारमध्ये उपस्थित असलेले ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, 'होम आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांनी रेमडेसीव्हीरचा उपयोग स्वतःच करू नये. अशा रूग्णांनी सकारात्मक राहून रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यांना यामुळे दिलासा मिळेल.'
एम्सचे आणखी एक डॉक्टर म्हणाले की, 'ऑक्सिजनची पातळी 94 खाली गेली तर त्वरित रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, ऑक्सिजनची पातळी पाहताना, रुग्णाचे वय आणि त्याला आधी कोणते आजार आहेत हे देखील लक्षात घेतले पाहिजे.'
या तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना-संक्रमित 80 टक्के रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत. हे देखील समोर आले आहे की जर रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांनी काही दिवसांनंतर पुन्हा आरटीपीसीआर करावे. याशिवाय त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी. तज्ञांनी यावेळी असेही सांगितले की, कोरोना संक्रमणादरम्यान, रुग्णाला वेळेवर औषधोपचार आणि पूर्ण डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एम्सच्या तज्ञांच्या मते, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड आणि फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांनी घरी क्वारंटाईन होण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण घरी असताना खबरदारी घेणे महत्त्वाचे असते.'