'या' ठिकाणी सापडला Coronavirusचा धोकादायक व्हेरिएंट!

जगभरात R.1 व्हेरिएंटचे रुग्ण कमी असले तरी त्याचा धोका जास्त आहे. 

Updated: Sep 26, 2021, 09:37 AM IST
'या' ठिकाणी सापडला Coronavirusचा धोकादायक व्हेरिएंट! title=

दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. कोविड 19 ची प्रकरणं अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यातच आता कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. कोविड 19चा सर्वात धोकादायक व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. त्याचं नाव R.1 व्हेरिएंट आहे.

धोकादायक ठरू शकतो R.1 व्हेरिएंट

जगभरात R.1 व्हेरिएंटचे रुग्ण कमी असले तरी त्याचा धोका जास्त आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला दीड वर्षांहून अधिक काळ उलटला आहे आणि जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या व्हेरिएंटबाबत तज्ज्ञांनी दिला इशारा 

कोरोना विषाणूच्या या धोकादायक व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांनी लोकांना सावध केलं आहे. संशोधकांनी अलीकडेच अमेरिकेत कोरोनाचं रूप R.1 ओळखलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, R.1 व्हेरिएंटच्या रूग्णांची कमी संख्या असूनही निष्काळजीपणा करता येणार नाही. हे धोकादायक सिद्ध होऊ शकतं.

कोरोना R.1चं नवीन व्हेरिएंट काय आहे?

तज्ज्ञांच्या मते, R.1 व्हेरियंट अमेरिकेतील संशोधकांनी नुकतंच ओळखला असला, तरी हा व्हेरिएंट जपानमध्ये गेल्या वर्षी सापडला आहे. या व्यतिरिक्त, R.1 व्हेरिएंट इतर अनेक देशांमध्येही सापडला आहे. जाणून घ्या की, कोरोनाच्या व्हेरिएंट R.1 ची प्रकरणं अमेरिकेसह जगातील सुमारे 35 देशांमध्ये आढळली आहेत. त्यांची संख्या 10 हजाराहून अधिक आहे.