नखांवर असे रंग दिसत असतील, तर तो त्वचेचा कर्करोग असू शकतो

तसेच नखावर असलेल्या सफेद लाइन आणि ठिपका असण्याचे कारण, हृदय संबंधी विकार असू शकतात. म्हणून जर तुमच्या नखांवरण असे निशाण असेल, तर त्याला दुर्लक्षित करू नका. 

Updated: Jun 25, 2019, 07:52 PM IST
नखांवर असे रंग दिसत असतील, तर तो त्वचेचा कर्करोग असू शकतो title=

मुंबई : तुम्ही कधी तुमच्या नखांना नीट बघितले आहे का, नाही तर तुमच्या नखाचा एक छोटासा भाग पांढरा असतो. हे सामान्य आहे, परंतू खूप वेळा नखांवर पांढरी लाइन किंवा ठिपका असतो. आपल्याला असे वाटते की, हे कॅलशियम किंवा मिनरल्सची कमी असल्यामुळे किंवा नखावर लागल्यामुळे असेल. अनेक वेळा हे डाग मॅनिक्योर आणि पेडिक्योरमुळे देखील होतात.  

तसेच नखावर असलेल्या सफेद लाइन आणि ठिपका असण्याचे कारण, हृदय संबंधी विकार असू शकतात. म्हणून जर तुमच्या नखांवरण असे निशाण असेल, तर त्याला दुर्लक्षित करू नका. नखांमुळे एखाद्या व्यक्तीच्या शारिरीक आरोग्याबद्दल खूप काही समजते. नखावर पांढरा रंगाच्या डागाच्या व्यतिरिक्त काळ्यारंगात दिसला, तरी लगेच डॉक्टरकडे जा. पण दिसणारी ही सर्वच लक्षणं कॅन्सरची असतीलच असे देखील सांगता येत नाही.

अमेरिकन अॅकेडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या अभ्यासानुसार, जर नखांवर काळा डाग असेल, तर हे त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. हे डाग मेलनॉंम नावाच्या त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे आहेत, जो घातक आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की नखात सुध्दा त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे दिसू शकतात.  

नखांमध्ये अजून काय बघितल्यावर समजेल की ते त्वचेच्या कर्करोगाचे लक्षणे आहेत की नाही.

ही लक्षणे आहेत 
- कमकूवत नखे जी लगेच तुटतात
- नखांजवळ रक्तस्त्राव होणे
- नखांवर हल्क्या काळ्या रंगाचे डाग आणि सोबत बघा ते डाग, डाग वाटत नाहीत.
- त्याच बरोबर नखांच्या आजूबाजूचा रंग बदलेला आहे का

असे असेल तर निष्काळजीपणा करू नका, नाहीतर हा त्वचेचा कर्करोग वाढेल. जर तुमचे नख काळे झाले असेल तर, त्यावर नेलपॉलीश लावू नका. पण तुम्ही घाबरून देखील जावू नका, आधी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.