Curd in Periods: मासिक पाळीत दहीचे सेवन करावे की नाही? याचे फायदे-तोटे जाणून घ्या

या काळात स्त्रियांनी काय खावे? काय खाऊ नये या सगळ्या गोष्टीनी त्यांना माहिती असणे फार गरजेचे असते.

Updated: Feb 18, 2022, 04:58 PM IST
Curd in Periods: मासिक पाळीत दहीचे सेवन करावे की नाही? याचे फायदे-तोटे जाणून घ्या title=

मुंबई : महिलांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात महिलांना पोटात दुखणे, अंग दुखणे, डोकं दुखणे, उलट्या, मुड स्विंग होणे. या समस्या उद्भवतात. त्यामुळे काळात महिलांना स्वत:ची फारच काळजी घ्यावी लागते. म्हणूनच महिलांना मासिकपाळी किंवा पिरियड्समध्ये खाण्यापिण्याबाबत काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.

त्यामुळे स्त्रियांनी काय खावे? काय खाऊ नये या सगळ्या गोष्टीनी त्यांना माहिती असणे फार गरजेचे असते. असाच एक खाद्य पदार्थ म्हणजे दही, ज्यापासून मासिक पाळी दरम्यान लांबच राहण्यासाठी सांगितले जाते.

जुन्या विचारसरणीनुसार पीरियड्समध्ये दह्याचे सेवन जास्त केल्याने जास्त रक्तस्राव होतो आणि त्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. पण यामागील खरं कारण काय आहे हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया

खरे तर लोकांच्या मानण्यानुसार  मासिक पाळीत दही किंवा काही आंबट पदार्थ खाल्ल्याने महिलांमध्ये काही समस्या उद्भवू शकतात. तर तज्ञांचा असा विश्वास आहे की दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म आहेत, जे आतड्यांतील बॅक्टेरियासाठी चांगले आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करतात. 

याशिवाय दही आणि दूध हे कॅल्शियम, फॅट आणि प्रोटीनचाही चांगला स्रोत आहे. या उत्पादनांना खाल्ल्यामुळे मूड स्विंग, चिंता आणि नैराश्य येत नाही.

दहीमध्ये कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि त्यांचा विकास होतो. याशिवाय दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनाच्या समस्यांपासून आराम देतात. एवढेच नाही तर मासिक पाळी दरम्यान ताजे दही खाल्ल्यास स्नायू दुखणे आणि क्रॅम्पपासून आराम मिळतो.

त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हण्यानुसार मासिक पाळीदरम्यान दही खाल्लेले चांगले

रात्री दही खाणे टाळावे
दही हे थंड असल्यामुळे त्याला रात्री खऊ नये. मासिक पाळीदरम्यान किंवा इतर वेळी सुद्धा रात्री दही खाऊ नये. रात्री याचे सेवन केल्याने पित्त आणि कफाची समस्या वाढते. दिवसा दही खा आणि नेहमी ताजे दही खा.

जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही. उलट, हे मासिक पाळी दरम्यान गमावलेले पोषण देखील भरून काढतील.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)