कानातला मळ साफ करताय, 'या' चुका टाळा

कान साफ ​​करताना 'या' चुका कधीही करू नका,अन्यथा येईल बहिरेपण 

Updated: Jul 18, 2022, 01:47 PM IST
 कानातला मळ साफ करताय, 'या' चुका टाळा  title=

मुंबई : कानात मळ साचण्याच्या समस्या प्रत्येकालाचं उद्भवतात. हा मळ काढण्यासाठी काही लोक कापसाच्या कांड्या, टूथपिक्स, सेफ्टी पिन, चाव्या अशा अनेक गोष्टींचा वापर करत असतात. मात्र या गोष्टी त्यांच्या कानासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे नेमके कशाप्रकारे कान साफ करावे? कान साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा याची माहिती देणार आहोत. 

कानात मेण तयार होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ती आपल्या कानाच्या पडद्याचे रक्षण करण्यासाठी असते, परंतु जर ते जास्त प्रमाणात जमा झाले तर ऐकण्यात समस्या येतात. चला जाणून घेऊया कान साफ ​​करताना लोक कोणत्या चुका करतात.

कापसाच्या काड्या
कापसाच्या काड्या अनेक लोक बिनदिक्कतपणे वापरतात, परंतु कान स्वच्छ करण्याचा हा योग्य मार्ग नाही. हे कानातले मेण आतमध्ये ढकलते, ज्यामुळे कानाचा ड्रम फुटण्याचा धोका निर्माण होतो.

'या' गोष्टी टाळा
अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी टूथपिक्स, सेफ्टी पिन, चाव्या, हेअर क्लिप यासारख्या गोष्टी वापरतात. त्यामुळे कानाला दुखापत किंवा रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यामध्ये कानाचा पडदा खराब होतो आणि तुम्ही बहिरेही होऊ शकता.

मेणबत्तीही टाळा
सोशल मीडियाच्या जगात आजकाल कान साफ करण्यासाठी मेणबत्तीचा वापर करतात. परंतु बहुतेक ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट हे तितके प्रभावी मानत नाहीत. तसेच, ही पद्धत धोक्यापासून मुक्त नाही. कारण यामुळे चेहरा, केस, बाहेरील कान आणि कानाचा आतील भाग बर्न होऊ शकतो.

काय करावे?
तुम्ही स्वतः कान स्वच्छ न करता ओटोलॅरिन्गोलॉजिस्टची मदत घ्यावी हे उत्तम. जर स्वत: स्वच्छ करण्याची सक्ती असेल, तर कानात ग्लिसरीन, खनिज तेल किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकून कान मऊ करा आणि नंतर सॉफ्ट टिश्यूच्या मदतीने स्वच्छ करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)