बाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check

Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..

राजीव कासले | Updated: Nov 27, 2023, 02:40 PM IST
बाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check title=

Health News : रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा, असं म्हटलं जातं. मात्र आता हेच  सफरचंद (Apple) तुमच्या जीवावर उठू शकतं. कारण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे ताजे आणि चमकदार दिसणारे बाजारातले सफरचंद गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात असा दावा करण्यात आलाय. अनेक जण पौष्टीक असं सफरचंद खातात. त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याची लखोल करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये (viral message) काय दावा केलाय पाहा...

व्हायरल मेसेज
'चमकदार सफरचंद खात असाल तर वेळीच सावध व्हा, केमिकलचा (Chemical) वापर होत असल्याने ते पोटात गेल्यास मृत्यू होऊ शकतो' हा मेसेज व्हायरल करून यामुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात असा दावा केल्यानं अनेकांच्या मनात चमकदार सफरचंदांबाबत भीती पसरली आहे. पण या व्हायरल मेसेजवर तज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेऊया.

व्हायरल पोलखोल
स्टोअरहाऊसमध्ये ठेवलेल्या सफरचंदांमध्ये 13 टक्के कॅन्डिडा ऑरिस आढळलं आहे. कॅन्डिडा ऑरिस हा बुरशीचा प्रकार आहे. हे पोटात गेलं तर आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे आमच्या पडताळणीत चमकदार सफरचंद खाल्ल्याने थेट मृत्यू होत नसला तरी गंभीर आजार होऊ शकतो हे स्पष्ट झालं.  हा रिसर्च भारतात झालेला नसला तरी अशा सफरचंदांपासून खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे चमकदार सफरचंदामुळे मृत्यू होतो हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सफरचंद खाण्याचे फायदे
सकाळी चांगली सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. अनेकवेळा आपण सफरचंदाची साल काढून टाकोत. पण तुम्हाला माहिती आहे का सफरचंदाच्या सालीत असलेल्या फिनोलिक संयुगांमुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही त्यामुळे हृदयासंबंधीत आजार दूर राहतात.  इतकंच नाही तर सफरचंद मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.  सकाळी वर्कआऊट करणाऱ्यांच्या ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये एक सफरचंद नक्कीच असावं. कारण व्यायामाआधी सफरचंद खाल्ल्यास तुमचा स्टॅमिना वाढण्यास आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

लठ्ठपणा रोखण्यासाठी सफरचंद उपयोगी ठरु शकतं. सफरचंदामध्ये फायबर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.