मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय

रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 21, 2017, 11:33 PM IST
मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय title=

मुंबई : रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....

रडणे

- आपला बॉयफ्रेंड किंवा पतीचे मन वळविण्यासाठी मुली, महिला या रडू लागतात. त्यांना माहिती असते की, ही मात्रा पटकन लागू पडते आणि समोरच्याचे मन विरघळते.

- फोवर बिजी असणे

गर्लफ्रेंडचा फोन बिझी येण्यासारखी अनेकदा शिक्षा असत नाही. अनेकदा याच ट्रीकचा वापर मुली मुलांना हैराण करण्यासाठी करतात. पण. विशेष असे की, जर मुलांचा फोन त्यांना बिझी लागला तर, त्या पश्नांची सरबत्ती करतात.

-एक्स बॉयफ्रेंडचे कौतूक

हे एक हमखास हत्यार. आपल्या बॉयफ्रेंडला चिडविण्यासाठी मुली आपल्या एक्स बॉफ्रेंडचे कौतूक करतात.

- कमीपणा दाखवने

हा तसा अपवादात्मक स्थितीत वापरला जाणारा पर्याय आहे. पण, मुली जेव्हा जास्त चिडतात तेव्हा शक्यतो मुलातील कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात.

- कौतूक करणे

अनेकदा मुलांचे मन वळविण्यासाठी मुली त्याचे कौतूक करतात. अनेकदा याला मस्का मारणे असेही म्हटले जाते. पण, हा पर्याय मुली क्वचितच वापरतात, असे काही मंडळी सांगतात.