पावसात भिजताच मुलींच्या मनात येतात हे '५' विचार!

पावसाच्या थेंबाचा मातीला स्पर्श होताच तिच्यातून येणारा सुगंध अप्रतिम असतो.

Updated: Jul 27, 2018, 11:34 AM IST
पावसात भिजताच मुलींच्या मनात येतात हे '५' विचार! title=

मुंबई : पावसाच्या थेंबाचा मातीला स्पर्श होताच तिच्यातून येणारा सुगंध अप्रतिम असतो. त्याला कशाचीच तोड नाही. उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाचा गारवा मनाला सुखावतो. आनंद देतो आणि त्याचबरोबर अनेक नकळत इच्छा जागृत होतात. मुलींना याचा अनुभव नक्कीच असेल. तर जाणून घेऊया पावसाळ्यात मुलींना नक्की काय वाटते...

पावसात भिजावे 

पाऊस येताच पावसात मनसोक्त भिजावे, असे वाटते. उन्हाळामुळे त्रासलेले शरीर-मन पावसाळ्यात सुखावते. त्याचबरोबर त्वचा देखील मऊ मुलायम होते.

भजी खावी वाटते

लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच पावसाच्या रिमझिमीत भजी खावी वाटते. गरमागरम भजीसोबत वाफाळलेला चहा हवाच. 

बाईकवर फिरायला जावे

पावसाळ्यात पार्टनरसोबत बाईक राईड तर बनतेच. हलक्या रिमझिम पावसात पार्टनरसोबत बाईकवर बसून फिरायला जाण्याची मज्जा काही औरच.

पावसाकडे बघत राहणे

अनेक मुलींना बाल्कनीत बसून पावसाकडे तासंतास बघत बसायला खूप आवडते. पावसाला न्याहाळत मुली कितीही वेळ बसू शकतात. पावसाचे टपोरे थेंब, दाटून आलेलं आभाळ, हिरवगार झालेलं वातावरण त्यांना अतिशय सुखावतं.

पार्टनरसोबत पावसात भिजणे

पावसात पार्टनरसोबत हातात हात घालून फिरणे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. पार्टनरचा हातात हात हवा आणि खूप गप्पा हे तर अप्रतिक कॉम्बिनेशन आहे.