दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे !

दूध हे पूर्णअन्न समजले जाते. 

Updated: Jun 27, 2018, 11:33 AM IST
दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे !  title=

मुंबई : दूध हे पूर्णअन्न समजले जाते. रात्री किंवा अवेळी लागलेल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते फायदेशीर समजले जाते. निद्रानाशाच्या समस्येवर परिणामकारक असल्याने अनेकजण झोपण्यापूर्वी ग्लासभर दुध पितात. मात्र नुसतेच दूध पिणं शक्य नसलेले अनेकजण त्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साखर मिसळतात. मात्र रिफाईन्ड साखर आरोग्याला अपायाकारक असल्याने त्याला नैसर्गिक पर्याय असणार्‍या गूळाचा आरोग्याला अनेकप्रकारे फायदेशीर ठरते. 

फायदेशीर गूळ 

गूळामध्ये  मिनरल्स आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात रक्ताची निर्मिती होणं, मांसपेशी मजबूत होणं, सांध्याचे दुखणे आटोक्यात राहण्यास मदात होते. 

दूधात गूळ मिसळल्याचे फायदे - 

दूधात गूळ मिसळून प्यायल्याने पचन सुधारते. पचनाशीसंबंधी  काही समस्या असल्यास दूर होतात. सोबतन अन्न पचनाच्या क्रियेला चालना मिळते. दूध-गूळाच्या मिश्रणामुळे पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता कमी होते. 

अस्थमाच्या रूग्णांसाठी गूळ आणि दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते. थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.  

सांध्याचे दुखणे असणार्‍यांसाठी हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. दुधातील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम घटक आणि गूळातील आयर्न घटक सांध्यांना अधिक मजबूत बनवतात. गूळचा तुकडा आल्यासोबत चघळल्यानेही फायदा होतो.  

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गूळ खाऊन त्याचे प्रमाण  वाढवणं फायदेशीर आहे. गूळामुळे शरीरात हिमोग्लोबिन घटक वाढतात. सोबतच शरीराची रोगप्रतिकारकक्षमता सुधारते. महिलांमध्ये अनियमित मासिकपाळीचा त्रास असल्यास दूध -गुळाचे मिश्रण फायदेशीर ठरते. 

वजन घटवण्यासाठी दूधासोबत गूळ मिसळून पिणे हे हेल्दी ड्रिंक आहे. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास, परिणामकारक आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे साखरेऐवजी गूळ वापरणं अधिक फायदेशीर आहे.