डोळ्यांचा थकवा आता करा झटपट दूर, वापरा या सोप्या टिप्स

डोळ्यांचं चुरचुरणं किंवा थकवा घालवण्यासाठी घरच्या घरी करा हे झटपट उपाय

Updated: Aug 1, 2022, 08:52 PM IST
डोळ्यांचा थकवा आता करा झटपट दूर, वापरा या सोप्या टिप्स title=

मुंबई : सतत फोनवर किंवा कंप्यूटरवर काम करून आपल्या डोळ्यांनाही थकवा येतो. डोळ्यांनाही आराम हवा असतो. बऱ्याचदा डोळे खूप चूरचूरतात. डोळ्यांना झापडं येतात त्यामुळे थकवा येतो अशावेळी डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. 

डोळे हे चेहऱ्याचे सौंदर्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सारखं स्क्रीनला पाहून काम केल्याने डोळे थकतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, थकवा, डोळ्यांना सूज येणे आणि जडपणा यांसह अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. 

अशावेळी डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे स्वच्छ साध्या पाण्याने धुवा. डोळ्यांच्या पापण्या थोड्या वेळाने उघडझाप करा. थोडावेळ डोळे बंद करून बसा. यामुळे तुमचा त्रास कमी होईल.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांवर कापूस दुधामध्ये भिजवून त्याच्या घड्या ठेवू शकता. याशिवाय गुलाब पाण्याच्या घड्या देखील डोळ्यांवर ठेवू शकता. त्यामुळे थंडावा मिळतो. थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. 

तुम्ही टी बॅगचा वापरही करू शकता. टी बॅग आधी फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर त्याला साध्या पाण्यात डीप करून डोळ्यांवर ठेवा. ही काळजी घ्या की ते पाणी डोळ्यात जाणार नाही. यामुळे तुमच्या डोळ्याचे डार्क सर्कल दूर होतील. डोळ्यांवर काकडी देखील तुम्ही ठेवू शकता. 

बटाटा आणि पुदिना सात डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बटाटे आणि पुदिन्याची पाने घेऊन दोन्ही बारीक करा. ही पेस्ट दाबून रस काढा.आता हा रस कापसाच्या मदतीने डोळ्यांवर लावा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा सहज दूर होईल.

(Disclaimer: वर दिलेल्या माहितीची झी 24 तास कोणतीही खातरजमा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)