सावधान! लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक, ही आहेत लक्षणे

सध्याच्या काळात हृदयविकार (Heart disease) होणं खूप कॉमन झालं आहे. पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack)आल्याचे समजत होते. आता तर अगदी तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि जीवही गमवावा लागतोय.

Updated: Aug 18, 2022, 05:04 PM IST
सावधान! लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक, ही आहेत लक्षणे  title=

मुंबई: सध्याच्या काळात हृदयविकार (Heart disease) होणं खूप कॉमन झालं आहे. पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack)आल्याचे समजत होते. आता तर अगदी तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि जीवही गमवावा लागतोय. हल्ली हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक (Stroke), हार्ट फेल होणे, अशा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना तरुणांनाही करावा लागतो. मात्र आता तर लहान मुलांमध्ये (In children) हृदयविकाराच्या आजाराचे (heart disease) प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहित असले पाहिजे की गैर-हेल्दी जीवनशैली आणि चुकीच्या आहाराचे (wrong diet) परिणाम किती गंभीर असू शकतात.

मुलांमध्ये लठ्ठपणाची वाढती समस्या

गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगड, आसाम आणि तामिळनाडूमधील 13 ते 18 वर्षे वयोगटातील 937 मुलांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. बालपणापासून पौगंडावस्थेकडे जाणाऱ्या या मुलांच्या आहारात सोडियम, फॅट आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे, तर फायबरयुक्त आहार नगण्य असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या मुलांना गेल्या 24 तासांत काय खाल्ले, असे विचारण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केवळ 11 टक्के मुले अशी होती, ज्यांनी गेल्या 24 तासांत दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन केले होते.
तर गुजरातमध्ये केवळ 1 टक्के मुले अशी होती. त्या बदल्यात महाराष्ट्रातील ६२% मुलांनी ब्रेड खाल्ले होते. तर 29% मुलांनीही त्यांच्या जेवणात वरून साखर खाल्ल्याचे मान्य केले आहे.

जंक फूड धोक्याचे कारण

26 टक्के मुलांनी जास्त फॅट आणि जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ले होते. त्याच वेळी, तेलात तळलेले अन्न खाणारी 30 टक्के मुले होती. करंट डेव्हलपमेंट्स इन न्यूट्रिशन या जर्नलमध्ये हे सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आले आहे. गहू, डाळी, तांदूळ आणि जगातील प्रत्येक भरडधान्याचे उत्पादन करणार्‍या भारतातील मुलांनी त्यांच्या ताटाची जागा जंक फूडच्या ताटाने घेतली आहे, हेही भारतातील मुलांच्या वाढीचे आकडे दाखवत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातील 5 वर्षाखालील 3.4% मुले लठ्ठ आहेत. 2015 च्या सर्वेक्षणात फक्त 2 टक्के होती. युनिसेफच्या वर्ल्ड ओबेसिटी ऍटलस 2022 ने अंदाज व्यक्त केला आहे की 2030 पर्यंत भारतात 27 दशलक्ष किंवा 27 दशलक्ष मुले लठ्ठ असतील आणि जगातील प्रत्येक 10 मुलांपैकी एक लठ्ठ असेल.