टॉयलेट फ्लशला दोन बटणं का असतात? जाणून घ्या यामागचे कारण

सध्याच्या मॉडर्न टॉयलेटमध्ये दोन प्रकारची फ्लश बटणे असतात. एक बटण दुसऱ्याच्या तुलनेत लहान असते तर दुसरे बटण मोठे असते.

Updated: Jun 13, 2018, 04:30 PM IST
टॉयलेट फ्लशला दोन बटणं का असतात? जाणून घ्या यामागचे कारण title=

मुंबई : सध्याच्या मॉडर्न टॉयलेटमध्ये दोन प्रकारची फ्लश बटणे असतात. एक बटण दुसऱ्याच्या तुलनेत लहान असते तर दुसरे बटण मोठे असते. प्रत्येक व्यक्ती ही दोनही बटणांचा वापर करतो. मात्र ही दोन बटणे असण्यामागे कारणं आहेत. जाणून घ्या यामागचे कारण...

सध्याच्या टॉयलेट फ्लशला दोन बटणे असतात. एक लहान तर एक मोठे असते. मात्र दोघेही एकमेकांशी कनेक्ट असतात. मोठ्या आकाराच्या फ्लश बटणमध्ये  ६ ते ९ लीटर पाणी सुरक्षित असते तर लहान फ्लश बटणामध्ये ३ ते ४.५ लीटर पाणी राहते.

दोन्ही बटणांची वेगवेगळी कामे

जेव्हा तुम्हाला टॉयलेट फ्लश करायचे असेल तेव्हा लहान बटणाचा वापर करावा तर सॉलिड वेस्ट फ्लश करायचेय तेव्हा मोठ्या फ्लश बटणाचा वापर करावा. 

फ्लश बटणाशी संबंधित फायदे

टॉयलेट फ्लशमधील मोठ्या बटणामुळे अधिक पाणी वापरले जाते. त्याच्या तुलनेत लहान फ्लश बटणाचा वापर केल्यास पाणी कमी वापरले जाते. जर प्रत्येकाने टॉयलेटच्या छोट्या फ्लशचा वापर केल्यास तर दरवर्षी साधारण २० लीटर पाण्याची बचत होते. त्यामुळे छोट्या फ्लश बटणाचा वापर केल्यास तुम्ही पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करु शकता.