टाचदुखीपासून आराम देणारे घरगुती उपाय

सतत उभे राहणार्‍यांमध्ये, सतत हाय हिल्स घालून चालल्यानेही पायदुखीचा आणि प्रामुख्याने टाचा दुखतात. 

Updated: Aug 1, 2018, 06:44 PM IST
टाचदुखीपासून आराम देणारे घरगुती उपाय  title=

मुंबई : सतत उभे राहणार्‍यांमध्ये, सतत हाय हिल्स घालून चालल्यानेही पायदुखीचा आणि प्रामुख्याने टाचा दुखतात. स्टाइल्सच्या या काही कारणांसोबतच शरीरात पोषकतत्त्वांची कमतर्ता असल्यास, साखर, फॅट्स, हार्मोन्स यांच्या असंतुलनामुळे टाचा दुखतात. टाच्यांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? हे अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करतात. 

टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय  

1. टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी दिवसांतून किमान 3 वेळेस नारळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा.  

2. हळदीमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. टाचदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी ग्लासभर दूधात हळद व मध मिसळून प्यावे. 

3. टाचा दुखत असतील टपअम्ध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ मिसळा. या पाण्यात पाय बुडवून काही वेळ बसल्याने थकवा कमी होण्यास, टाचदुखीचा त्रास काम होण्यास मदत होईल. 

4. नियमित सकाळी रिकाम्यापोटी कोरफडीचा रस प्यावा. यामुळे वारंवार टाचदुखीचा त्रास असणार्‍यांना आराम मिळतो.