मुंबई : इतर त्वचेच्या तुलनेत कोपरे, ढोपर, घोटा या भागावरील त्वचा अधिक काळवंडलेली दिसते. या भागावर त्वचा जाड असते. त्यामुळे तिला स्वच्छ करणं कठीण असते. वेळोवेळी या भागातील त्वचेची काळजी न घेतल्यास शरीरातील इतर त्वचेच्या तुलनेत या भागातील त्वचा अधिक काळवंडलेली दिसू शकते.
स्क्रिन पिगमेंटेशन तुमच्या सौंदर्यामध्ये अडथळा निर्माण करतायत का? कोपरे आणि गुडघ्याची त्वचा इतर त्वचेपेक्षा अधिक जाडसर असल्याने काळपट दिसतात. त्यात नेहमीच्या काही अॅक्टीव्हिटीज या भागाचे अधिक नुकसान करण्यास कारणीभूत ठरतात. कालांतराने त्वचेवर डेड स्क्रिनचा थर साचल्याने पिगमेंटेशन अधिक वाढते. मग अशावेळी या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी दूध, मध आणि हळद अधिक फायदेशीर ठरते. आबालवृद्धांमध्ये वाढणार्या या समस्येवर काही नैसर्गिक उपायदेखील फायदेशीर ठरतात.
हळद, मध आणि दूध याचा एकत्र पॅक स्किन पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. दूधात लॅक्टिक अॅसिड असल्याने त्यात नॅचरल ब्लिचिंग गुणधर्म आहेत. तर हळद ही अॅन्टीसेप्टिक, अॅन्टी बॅक्टेरियल आणि दाहशामक असल्याने तेथील त्वचा सुधारण्यास, पोत सुधारण्यास मदत होते. मध हे त्वचा मॉईशचराईज करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेमधील जाडसरपणा कमी होतो व ती अधिक हायड्रेटेड होते.
कच्च दूध, मध आणि हळद एकत्र करून त्याची पातळ पेस्ट बनवा.
कोपरे, गुडघा यावर ही पेस्ट वर्तुळाकार दिशेत फिरवत लावा.
पॅक लावल्यानंतर 20-25 मिनिटे हा पॅक त्वचेवर सुकू द्यावा.
त्यानंतर पॅक पाण्याने स्वच्छ धुवा.
महिनाभर हा प्रयोग केल्यास तुम्हांला अपेक्षित निकाल मिळण्यास मदत होईल.