मुंबई : गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. अशावेळी पार्लरमध्ये जाताना देखील महिलांनी विचार करावा. कारण पार्लरमध्ये वापरले जाणारे केमिकल्स हे बाळासाठी चांगले चांगले नाही. अनेकदा महिला स्ट्रेफ फ्री होण्यासाठी तसंच फ्रेश वाटण्यासाठी हेअर स्पा करून घेतात. मात्र हेअर स्पा करताना गरोदर महिलांनी तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने नाजूक असल्याने या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे केसांसाठी कोणतीही ट्रीटमेंट घेणार असाल तर तीन महिने वाट बघा. कारण या काळात बाळाचे स्नायू, अवयव तसंच हेयर फॉलिकल्स यांची वाढ होत असते. त्यामुळे त्या काळात केमिकल्सशी संबंध टाळले पाहिजेत. जे बाळाच्या वाढीसाठी देखील अनुकूल ठरेल.
गर्भधारणा झाल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि प्रॉडक्स वापरले पाहिजेत. शक्यतो अमोनिया फ्री प्रॉडक्सचा वापर करणं फायदेशीर ठरेल. नैसर्गिक प्रॉडक्समुळे कोणताही त्रास होत नाही. शिवाय बाळासाठी देखील ते त्रासदायक ठरत नाहीत.
हेअर स्पा करताना केमिकल्सचा वापर केला जातो. त्याला पर्याय म्हणून नैसर्गिक तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरेल. नैसर्गिक तेलाच्या वापराने पोषणंही मिळेल. त्याचप्रमाणे ताणतणाव कमी होण्यास मदत होईल.
पार्लरमध्ये जाण्यापूर्वी तिथलं वातावरण आणि स्वच्छेतेबद्दल खात्री करूनच मग जाण्याचा निर्णय घ्यावा. कारण पार्लरमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे इन्फेकशन होण्याचा धोका अधिक असतो. काहींना केमिकल प्रोडक्सच्या वासामुळे त्रास होऊ जाणवतो.