मुंबई : उन्हाळाचे दिवस सुरू झाले की घामाचा, त्याच्या दुर्गंधीचा, घामोळ्यांचा त्रास होतो. तीव्र उन्हामुळे सतत घाम आणि दुर्गंधी टाळण्यासाठी आहारात काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. मात्र त्यासोबतच परफ्युमचीही निवड करतात. अनेकांना परफ्युम कसा निवडावा हे ठाऊक नसतो. मग तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर जाणून घ्या हा एक्सपर्ट सल्ला फळांंच्या मदतीने उन्हाळ्यात कमी करा सनटॅनची समस्या
- मंद, फ्रेश आणि काही निवडक वासांच्या परफ्युमची उन्हाळ्यात दिवसात निवड करा. यामुळे तुमचा मुडही फ्रेश रहायला मदत होईल.
- स्त्रियांना उन्हाळ्याच्या दिवसात फ्रुटी (फळांच्या ) किंवा फ्रेश सुवास असणार्या काही परफ्युमची निवड अधिक चांगली आहे. यासोबतच कॅन्डी, फ्रेश, फुलांच्या परफ्युमचा वापर करा. रात्रीच्या वेळेस फुलांच्या परफ्युमची निवड अधिक योग्य आहे.
- मस्क किंवा सायट्रस प्रकारातील परफ्युम हे पुरूषांसाठी अधिक फायदेशीर आहे. दिवसा फ्रेश सायट्रस आणि रात्रीच्या वेळेत मस्क आणि स्पाईसी परफ्युमची निवड करा.
- युनिसेक्स म्हणजे मुला-मुलींसाठी एकच परफ्युमही बाजारात उपलब्ध आहेत. सध्या या 'युनिसेक्स परफ्युम'चीही चलती आहे. मंद सुवासामध्ये असणारे हे परफ्युम्स सायट्र्स किंवा ग्रासमध्ये असतात.
- लॉग लास्टिंग परफ्युमची निवड करा. लॅव्हेंडर, व्हेनिला, ylang ylang,जास्मिन यापासून बनलेले परफ्युम फार काळ टिकतात.
- eau de toilette ची निवड अधिक फायदेशीर ठरेल. हे परफ्युम मंद सुवासाचे, फ्रेश आणि उन्हाळ्याच्या दिवसात अधिक फायदेशीर ठरतात.
कडक ऊन आणि डिहाड्रेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी ५ उपयुक्त पदार्थ!