Skincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय...

Skincare After Holi : होळीचे काही रंग आठवडाभर निघत नाहीत, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण त्याच दिवशी हे सगळे रंग काढू शकतो अगादि मॅजिक प्रमाणे... (Skin Care Tricks After Holi)

Updated: Mar 1, 2023, 01:07 PM IST
Skincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय... title=

Skincare After Holi : होळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळा देश 7-8 तारखेला होळीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. होळी आणि धुळवडीचा विशेष उत्साह आपल्याकडे पाहायला मिळतो, एकमेकांना रंग लावून, मजा मस्ती करत होळीचा आनंद घेतला जातो.  (How to remove colors from face and body in holi days skincare tips in marathi)

आपल्याकडे काही जण बाजारातील रंगाचा वापर करतात. जे रंग त्वचेला लागले कि लवकर निघायचं  (Skincare After Holi ) काही नाव काढत नाहीत. हे रंग स्किनवरून काढणं म्हणजे एक चॅलेंजच होऊन जातं. चला तर मग आज होळी सेगमेंटमधून जाणून घेऊया, होळीच्या रंगाचे डाग काढण्याच्या भन्नाट आयडीच्या कल्पना या सोप्प्या 5 टिप्स मधून...(Skin Care Tricks After Holi)

होळीनंतर रंग काढण्याच्या सोप्प्या टिप्स (Colour Removing Tips After Holi)

होळी खेळून झाली की लगेचच स्वच्छ पाणी घ्या आणि त्याने हे रंग काढून टाकण्याचा प्रयत्न करा. रंग अगदी ताजे असतात त्यामुळे लवकर निघण्याची शक्यता असते.  जस जसे रंग अधिक ओले होतात ते आणखी स्किनला चिकटतात आणि लवकर निघत नाहीत. 

एका वाटीत दही घ्या त्यात २ मोठे चमचे लिंबू पिळाआणि हे मिश्रण एकजीव करा (Skincare After Holi ) आणि जिथे रंगाचे डाग लागले आहेत त्या भागावर हे मिश्रण लावा. थोडा वेळ तसाच राहूद्या मग हलक्या कोमट पाण्याने हे अंघोळ करा. रंग बऱ्यापैकी निघून जाण्यास मदत होईल. (Skin Care Tricks After Holi)

गुलाब पाणी घ्या त्यात, बेसन आणि बदामाचं तेल घाला. आणि ही तयार पेस्ट शरीरावर हलक्या हाताने चोळा आणि स्वच्छ पाण्याने अंघोळ करा. (Skincare After Holi )

कोमट पाण्याने चेहरा धुवा 

होळीच्या दिवशी काही रंग निघता निघत नाहीत अशावेळी, एक सोप्पा केला जाणारा उपाय म्हणजे हलक्या कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.  या नंतर रॉक सॉल्ट, ग्लिसरीन, अरोमा ऑइल एकत्र घेऊन ते चेहऱ्यावर लावून द्या. (How to remove colors from face and body)  हे मिश्रण अँटी बॅक्टरीअल आणि अँटी फंगल आहे. त्यामुळे ही पेस्ट लावल्यास केमिकलयुक्त रंगाचा कुठलाही परिणाम चेहऱ्यावर होणार नाही.