Health : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...

Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: May 18, 2024, 12:22 PM IST
Health : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात... title=
husband and wife have the same blood group are there problems in pregnancy What health experts say

Health News in Marathi : पूर्वीचा काळ असो किंवा आताचा मुला मुलीच लग्न जोडताना कुंडली पाहिली जाते. तरुण तरुणीचे किती गुण मिळतात यावर त्यांचं भविष्य ठरतं असा समज आहे. त्यासोबत मुला मुलीचा रक्त गट एक तर नाही ना हेही पाहिल जातं. घरातील मोठी मंडळी म्हणतात होणाऱ्या वधू वराचा रक्तगट हा कधीची एक नसावा. त्यामागे काही लोक सांगतात की, नवरा बायकोचा रक्तगट एकच असेल तर गर्भधारणाच्या वेळी समस्या निर्माण होता. शिवाय बाळ जन्माला आल्यानंतर त्यामध्ये काही विकृती जाणवे असं म्हणतात. पण या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे. अगदी यामुळे लग्नाच्या वेळी वधू वर अगदी डॉक्टरकडेही जाऊ सल्ला घेतात. यासगळ्यावर आरोग्य तज्ज्ञाच काय मत आहे ते जाणून घेऊयात. (husband and wife have the same blood group are there problems in pregnancy What health experts say)

 स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अलका गोडबोल यांच्याकडून आम्ही याबद्दल जाणून घेतलं. त्या म्हणतात आजही त्यांच्याकडे अनेक कपल येतात ज्यांना लग्न करायच आहे आणि त्यांचं रक्तगट हे एकच आहे. कारण हल्ली लव्ह मॅरेजच प्रमाण वाढलं आहे अशावेळी प्रेमात पडताना रक्तगट पाहिला जात नाही. मग त्यांचं रक्तगट एक असेल तर त्यांनी लग्न करायच का? पुढे जाऊ होणाऱ्या बाळावर त्याचा काही परिणाम होईल का? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. त्यावर मी कायम त्यांना सांगते ही जुन्या लोकांचा समज आहे की वधू वराच रक्तगट एक असेल तर गर्भधारणेवर परिणाम होता. पण असं काहीच नाही आहे, वधू वराच रक्तगट एक असेल तर आरोग्यावर परिणाम होत नाही. खरं तर याचा त्यांना फायदाच होतो ते एकमेकांना रक्तदान करु शकतात. 

लग्नापूर्वी रक्त तपासणी नक्की करा!

खरं तर लग्नापूर्वी वधू वराने रक्त तपासणी नक्की करावी. कारण तुमच्या रक्तात काही प्रॉब्लेम असतील तर पूर्वीच कळतात. शिवाय एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे की इतर लैंगिक आजारांनी बाधित याही प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्यामुळे लग्नापूर्वी वधू वराने रक्त तपासणी करावी. 

पती-पत्नीचे रक्तगट वेगवेगळे असेल तर...

डॉ. अलका गोडबोले म्हणतात की, वधू वराचे रक्तगट वेगवेगळे असतील तर त्याचा गर्भधारणेवर कसा परिणाम होतो ते समजतं. जर महिलेचा रक्तगट A+ असेल आणि पतीचा A- तर गर्भधारणेदरम्यान काही समस्या होऊ शकतात. जर बाळाला वडिलांकडून A- घटकांचा वारसा मिळाला, तर बाळाला आरएच इनकम्पेटिबिलिटी नावाची आजार होऊ शकतो. त्याशिवाय पहिल्या गर्भधारणेमध्ये बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह असल्यास, प्रसूतीच्या वेळी त्याच्या रक्त पेशी आईच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात. ज्यामुळे आईची रोगप्रतिकारक प्रणाली बाळाच्या रक्ताविरूद्ध काही एंटीबॉडीज तयार करते. ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान फीटल अब्नोर्मलिटी आणि गर्भपात यासारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)