ICMR NIN Dietary Guidelines : Body बनवण्यासाठी अजिबात घेऊ नका 'प्रोटीन सप्लिमेंट'; Kidney होईल डॅमेज

ICMR-NIN Dietary Guidelines For Indians : ICMR ने बुधवारी भारतीयांसाठी रिवाइज्ड डायट्री गाइडलाइन्स जाहीर केली आहे. यामध्ये आवश्यक पोषकतत्वे तसेच आजारांबाबत माहिती जाहीर केली आहे. यामध्ये प्रोटीन सप्लिमेंट घेताना कोणती विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. याबाबत माहिती दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 22, 2024, 03:39 PM IST
ICMR NIN Dietary Guidelines : Body बनवण्यासाठी अजिबात घेऊ नका 'प्रोटीन सप्लिमेंट'; Kidney होईल डॅमेज  title=

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने भारतीयांसाठी 17 डायटरी गाइडलाइन्स जाहीर केले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच मीठ, साखरेचे प्रमाण आणि अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फू़ड लेबल्सवर असलेली माहिती वाचण्याचा सल्ला दिला आहे. 

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन्स (Min) चे स्नायू बळकट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोटीन सप्लिमेंट्सला देखील विरोध केली आहे. प्रोटीन पावडरचा वापर अधिक काळासाठी केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे हाडांमध्ये खनिजांचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले आहे. एवढंच नव्हे तर याचा सर्वात मोठा परिणाम हा किडनीवर होत असल्याचे म्हटले आहे. 

सप्लिमेंट्स का घेऊ नये?

प्रथिने सप्लिमेंट्सचा दीर्घकाळ जास्त वापर केल्याने अनेक रोगांचा धोका वाढू शकतो. सप्लिमेंट खूप दिवस घेतल्याने ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट (EGFR) आणि सीरम क्रिएटिनिन पातळी वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यावर आणि किडनीवर होतो. याशिवाय ॲसिड-ॲश प्रथिने युक्त आहार घेतल्यास कॅल्शियमचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन हाडे ठिसूळ होऊ शकतात. 

सप्लिमेंट्सचे दुष्परिणाम 

प्रोटीन सप्लिमेंट्स जास्त दिवस घेतल्यास हाडांमधील खनिजांवर परिणाम होतो तसेच किडनीचे नुकसान होते. आपल्या शरीरासाठी प्रोटीन खूप महत्वाचे आहेत यात शंका नाही. अशा परिस्थितीत, प्रोटीन सप्लिमेंट्स न घेता मासे, समुद्री खाद्य, अंडी, बीन्स, मसूर, टोफू, वनस्पती-आधारित प्रथिने, दुग्धजन्य पदार्थ आणि सुकामेवा इत्यादी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा. यामुळे आवश्यक तो फायदा शरीराला होऊ शकतो. 

हेल्दी लाईफस्टाईल का महत्त्वाची?

भारतातील एकूण आजारांपैकी जवळपास 56.4% आजार हे चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. ICMR च्या गाईडलाईन्सनुसार, शारीरिक हालचाल आणि निरोगी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे टाइप 2 चा डायबिटिस, हृदयाशी संबंधीत आजार, हायपरटेन्शन सारखे आहे 80% नी कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ICMRने दिलेल्या 17 गाईडलाईन्सचा नक्की वापर करा. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)