लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका किती? ICMRचा नवा स्टडी

रोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत एक अभ्यास करण्यात आला आहे. 

Updated: Jul 17, 2021, 07:16 AM IST
 लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका किती? ICMRचा नवा स्टडी title=

मुंबई : गेल्या वर्षभरापासून अनेक देश कोरोनाशी लढा देतायत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. तर कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत एक अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने केला आहे.

आयसीएमआमरने हा अभ्यास करताना त्या लोकांच्या जीनोम विश्लेषणाच्या आधारावर केला आहे ज्यांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. आसीएमआरने भारतात केलेला हा पहिला स्टडी आहे जो लस घेतल्यानंतर कोरोनाने संक्रमित झालेल्या लोकांवर करण्यात आलाय. 677 लोकांवर करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये अधिकतर लस घेतलेले लोकं डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाल्याचं समजलं.

भारतातील 17 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील 677 लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. यामध्ये 482 लोकांना कोरोनाची लक्षणं दिसून आली तर 29 टक्के लोकांना कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. 

या अभ्यासात लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने होणारा मृत्यू दर खूप कमी नोंदवला गेला. या अभ्यासात समावेश करण्यात आलेल्या आणि लस घेतलेल्या 71 व्यक्तींनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. तर 604 लोकांनी कोविशिल्ड घेतली होती. 2 लोकांनी चीनची सिनोफार्म लस घेतल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये फक्त 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

स्टडीमध्ये नमूद केल्यानुसार, लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यावर 9.8 टक्के लोकांना रूग्णालयात भर्ती करावं लागलं तर केवळ 0.4 टक्के लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की कोरोनाची लस ही सुरक्षित आहे. आणि लस घेतल्यानंतर रूग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोकाही कमी होतो.