केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करता असाल तर हे जरुर वाचा

सकाळच्या गडबडीत अनेकदा केस धुतले की ते झटपट वाळवण्यासाठी महिला ड्रायरचा वापर करतात. कधीतरही केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे ठीक मात्र जर तुम्ही नेहमीच ड्रायरने केस सुकवत असाल तर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडतेय.

Updated: Oct 1, 2017, 04:30 PM IST
केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करता असाल तर हे जरुर वाचा title=

मुंबई : सकाळच्या गडबडीत अनेकदा केस धुतले की ते झटपट वाळवण्यासाठी महिला ड्रायरचा वापर करतात. कधीतरही केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे ठीक मात्र जर तुम्ही नेहमीच ड्रायरने केस सुकवत असाल तर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडतेय.

तुमचे केस जर आधीच ड्राय असतील आणि त्यातही तुम्ही जर केस सुकवण्यासाठी ड्रायर वापरत असाल तर केस अधिक राठ होतात. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाणही वाढते. केसांचा पोत बिघडतो. 

वारंवार ब्लोड्राय, आर्यनिंग करत असाल तर केसांचे आरोग्य बिघडते. केसांची नैसर्गिक चमक कमी होते. तसेच केस अधिकच ड्राय झाल्याने ते तुटतातही. यामुळे जेव्हा गरज असेल तरच ड्रायरचा वापर करा अन्यथा कपड्याच्या सहाय्याने केस वाळवा.