मॉडेल सारखं शरीर हवं असेल, तर आजपासूनच या 5 वर्कआउटला करा सुरूवात

मॉडेल सारखं शरीर हवं आहे....  

Updated: Jan 7, 2022, 03:57 PM IST
मॉडेल सारखं शरीर हवं असेल, तर आजपासूनच या 5  वर्कआउटला करा सुरूवात  title=

मुंबई : आजची जीवनशैली पाहिली तर व्यायम म्हणजे  वर्कआउट फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्लिम-ट्रिम आणि टोन्ड बॉडी हवी असेल, तर तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये काही व्यायाम प्रकारांचा समावेश करा. हा व्यायाम खांद्यापासून पोट, मांड्या आणि कॉफीच्या स्नायूंपर्यंत सर्वांना एकत्र आणण्यासाठी कार्य करतो. सुरुवातीला 5-6 वेळा करणे पुरेसे असेल. 

बर्पिस

त्यानंतर पुशअप्स... सुरुवातीला पुशअप्स करणे कठीण असू शकतं, परंतु ते आपल्या रूटीनमधून न वगळता, शक्य तितके करत रहा. कारण यामुळे हात आणि पाय परिपूर्ण आकारात येतात आणि शरीराचा स्टॅमिनाही वाढतो.

प्लँक करणं देखील सुरुवातीला आव्हानात्मक असेल, परंतु सतत सरावाने तुम्ही हा व्यायाम प्रकार जास्त काळ करू शकता. त्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी देखील कमी होऊ लागेल आणि फिगर एकाद्या मॉडेलसारखं दिसू लागेल. पण कोणताही व्यायाम प्रकार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

प्लैंक

गुडघ्याचे व्यायाम करण्यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नाही. काही आठवड्यांच्या सरावानंतर परिणाम दिसून येतात. याच्या मदतीने मांडीवर असलेली चरबी अगदी सहज कमी करता येते.