अतिरीक्त कॉफीचं सेवन मुळव्याधाच्या रूग्णांसाठी ठरतं हानिकारक? काय आहे सत्य!

मूळव्याधी म्हणजेच पाईल्सच्या समस्येचा तुमच्या दररोजच्या आयुष्यावर परिणाम होतो. 

Updated: Jul 29, 2022, 02:36 PM IST
अतिरीक्त कॉफीचं सेवन मुळव्याधाच्या रूग्णांसाठी ठरतं हानिकारक? काय आहे सत्य! title=

मुंबई : मूळव्याधी म्हणजेच पाईल्सच्या समस्येचा तुमच्या दररोजच्या आयुष्यावर परिणाम होतो. मूळव्याधीमुळे होणारा रक्तस्त्राव, वेदना आणि अस्वस्थता यामुळे तुम्हाला घरी राहणं किंवा ऑफीसचं काम करणं कठीण होऊन बसतं. पाईल्सच्या समस्येपासून आराम मिळावा यासाठी अनेक जण आहारात योग्य ते बदल करतात. 

पाईल्सचा त्रास असलेल्या व्यक्तींना डॉक्टर जंकफूड न खाण्याचा सल्ला देतात. मात्र याशिवाय काही चुका देखील तुमची पाईल्सची समस्या अधिक गंभीर करू शकतात. जाणून घेऊया या चुका कोणत्या...

बराच काळ एकाच ठिकाणी बसून काम करणं

जास्त वजन असलेल्या व्यक्तींना हा त्रास अधिक होऊ शकतो. जर तुम्ही ऑफीसमध्ये बराच वेळ बसून काम करीत असाल, सतत टीव्ही बघत असाल तुम्हाला बद्धकोष्टतेची समस्या बळावून शौचाला त्रास होण्याची शक्यता असते. शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे तुमच्या गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो. यासाठी बराच वेळ एका ठिकाणी बसणं टाळावं.

टॉयलेटमध्ये बसून वाचणं किंवा फोनचा वापर 

टॉयलेटमध्ये शक्यतो 10 ते 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ राहू नका. असं केल्याने गुदद्वारावर अधिक ताण येऊ शकतो. शौचाला बसून सकाळचा पेपर वाचणे अथवा मोबाईल वापर केल्याने वेळ जातो. यामुळे तुमच्या गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो. त्यामुळे शौचाला जाताना दहा मिनीटांचा टायमर लावा आणि जास्त वेळ कमोडवर बसून राहू नका.

Wet Wipes वापरणे

Wet Wipes शक्य असल्यास वापरणं टाळा. कारण ब-याच Wet Wipes मध्ये अल्कोहोल सारखे घटक असतात. या कारणाने तुमच्या दुख-या भागावर वेदना होऊ शकतात.

वेळेवर शौचाला न जाणे

शौचाला जाण्यास टाळाटाळ करु नका. कारण शौचाला अडवून ठेवल्यामुळे तुमच्या गुदद्वारावर अधिक ताण येईल. त्यामुळे शौचाला झाल्यास टाळाटाळ न करता वेळेत जा.