मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

काही जणींना मासिकपाळीच्या दिवसात खूपच त्रास होतो तर काहींसाठी हा हलकासा डिस्कम्फर्ट असतो.

Dipali Nevarekar | Updated: Mar 13, 2018, 09:17 PM IST
मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

मुंबई : काही जणींना मासिकपाळीच्या दिवसात खूपच त्रास होतो तर काहींसाठी हा हलकासा डिस्कम्फर्ट असतो.

प्रत्येकीला प्रत्येक महिन्यात वेगवेगळे दुखणं अनुभवायला मिळते. तिच्या प्रकृतीनुसार दुखणे, त्रास, रक्तस्त्राव हा वेगवेगळा असतो. 

ज्या महिलांना खूपच त्रास होतो त्यांना पेनकिलर  घेण्याची सवय असते. पण मासिकपाळीचे दुखणे अशाप्रकारे कमी करण्यासाठी पेनकिलरचा वापर कितपत योग्य आहे ? या बाबत अनेक  समज-गैर समज आहेत. मग तुमच्या मनातील या प्रश्नावर डॉक्टरांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. 

मासिकपाळीच्या दिवसात पोटदुखी किंवा वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्सचा माईल्ड डोस घेणं सुरक्षित आहे. मासिकपाळीच्या दिवसात पेनकिलर्स घेतल्यास स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होतो हा केवळ गैरसमज आहे. या उलट मासिकपाळीच्या काळात त्रास कमी करण्यासाठी paracetamol किंवा ibuprofen यासारख्या माईल्ड पेनकिलर्सच्या मदतीने सुरक्षितपणे menstrual cramps चा त्रास कमी करता येऊ शकतो.

तरूण मुलींमध्ये मासिकपाळीच्या दिवसांत menstrual crampsचा  तीव्र त्रास जाणवू शकतो. अशावेळेस मासिकपाळीच्या पहिल्या दोन दिवसात दोन पेनकिलर्सच्या गोळ्या घेणं देखील सुरक्षित आहे. पण दोनपेक्षा अधिक गोळ्या घेण्याइतपत दुखणे वाढल्यास स्त्रिरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

2. सतत पेनकिलर्स घेण्याची सवय असल्यास त्याचा आरोग्यावर निश्चितच दुष्परिणाम दिसून येतो. जसजशा तरूणी टीनएजच्या टप्प्यावरून पुढे जातात तसा मासिकपाळीच्या दरम्यानचा त्रासही कमी होतो. अनेकींमध्ये पहिल्या गरोदरपणाच्या नंतर मासिकपाळीतील त्रास कमी होतो.

3. मासिकपाळीचा त्रास कमी करण्यासाठी दोनपेक्षा अधिक गोळ्यांची गरज लागत असेल तर हे कदाचित शरीरात काही गंभीर समस्या वाढत असल्याचे संकेत देतात.  menstrual crampsचा  तीव्र त्रास म्हणजे फ्रॅब्रॉईड, पिसिओडी,ओव्हेरियन क्रिस्ट या समस्यांचे संकेत देतात.पण त्याचे वेळीच निदान होण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करा. त्यानुसार पुढील उपचार ठरवा.

menstrual crampsच्या तीव्र वेदनेप्रमाणेच मासिकपाळी येण्यापूर्वी सुरू झालेला त्रास मासिकपाळीचे चक्र संपल्यानंतरही जाणवत असल्यास हेदेखील काही समस्यांचे संकेत आहेत. या दुखण्यावर पेनकिलर्स पुरेसे परिणामकारक नसतात.

मासिकपाळीतील त्रास कमी करण्यासाठी केवळ पेनकिलर्सवर का अवलंबून राहू नये  ?

प्रत्येक औषधांप्रमाणेच ibuprofen/paracetamol या औषधांचादेखील आरोग्यावर परिणाम होतो. सतत अशाप्रकारची औषधं घेतल्यास –

गॅस्ट्रिक प्रॉब्लेम
पोटदुखी
हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता
छातीमध्ये भरल्यासारखे वाटणे
गरगरणे
पोटात क्रॅम्प येणं
डायरिया
उलट्या / मळमळणं

सुरक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवाल ? माईल्ड स्वरूपाची पेनकिलर घेतली तरीही ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close