उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपाच; फॉलो करा 'या' घरगुती टीप्स

Kidney Health Tips in Summer: सध्या सगळीकडे रोगराईचे सावट आहे. त्यातून बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), महागाईच्या (Inflation) काळात आपल्याला आपलं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचे आहे. त्यातून किडनीच्या समस्या या (Kidney Health) पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत. जाणून घ्या घरच्या घरी कसे कराल उपाय!

Updated: Mar 12, 2023, 01:27 PM IST
उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपाच; फॉलो करा 'या' घरगुती टीप्स  title=
Kidney health tips how to keep your kidney healthy in summer season marathi trending news

Kidney Health Tips in Marathi: अनेकदा आपल्यालाही किडनी स्टोन (Kidney Health) आणि त्यासंदर्भातील त्रास (Kidney Disease) होण्याची भिती आणि काळजी असते. त्यामुळे आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयही बदलतो. आपल्यासाठी आपले आरोग्य आता महत्त्वाचे ठरू लागले आहे. करोनानं आपल्याला आपल्या आरोग्याची (Health and Climate Change) काळजी घेणं हे किती महत्त्वाचे आहे हे शिकवलं आहे. त्यातून आता तरूण पिढीसह प्रौढवर्ग हे फिटनेस फ्रिक झाले आहेत. व्यायाम, योगा आणि आहार याकडे व्यवस्थित लक्ष देण्याचा आत्ताच्या पिढी मानस सकारात्मक आहे. त्यातून बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपल्यालाही आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिआवश्यक आहे.

सध्या किडनीचं आरोग्य जपणं हे सर्वांच्यापुढील आव्हान आहे कारण किडनीबाबतच्या अनेक तक्रारी लोकांमध्ये वाढू लागल्या आहेत. याला एकमेव कारण म्हणजे बदलती जीवनशैली, खाण्यापिण्यात बदल, अल्कोहोलचे (Alchohol) व्यसन आणि व्यायामाकडे दुर्लेक्ष. तेव्हा येत्या उन्हाळ्यात जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या किडनीचं आरोग्य कसं जपू शकता. 

आपल्याला किडनीचा त्रास होऊ नये म्हणून आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून पाण्याचीही यामध्ये महत्त्वाची भुमिका आहे. तुम्ही कोणत्या तऱ्हेचे पाणी पिता? तुमच्या शरीरात किती लीटर पाणी जाते आहे? त्यातून गरम पाणी प्यावे की थंड? याची योग्य काळजी घेणेही आवश्यक आहे. योग्य झोप (Sleep), वेळेवर खाणं-पिणं, भरपूर पाणी पिणं, जंक फूड (Aviod Junk Food) आणि अल्कोहोल टाळणं याकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु वातावरण बदलानुसार आपल्यालाही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या किडनीचं आरोग्य असे जपा. 

वेळेवर जेवा आणि व्यायाम करा

वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला वेळेवर आहार घेणे आवश्यक आहे. त्यातून नियमित व्यायाम (Excercise) करणेही गरजेचे आहे. तुम्ही या दोन गोष्टी व्यवस्थित पाळल्यात तर त्याचा चांगला फायदा तुमच्या शरीरावर होईल. तुमचे किडनीचे आरोग्यही चांगले राहील. 

गरम पाणी प्यावे की थंड पाणी?

आपल्याला दिवसभर 10 ते 12 ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे. त्यातून 3 लीटर पाणी जाणंही आपल्या शरीरात आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, किडनीासाठी गरम पाणी (Hot Water For Kidney) प्यावे. 

मद्यपान आणि धूम्रपानाची सवय सोडावी 

सध्याची जीवनशैली ही कल्पनेपेक्षाही बदलते आहे. त्यातून निम्म्याहून अधिक लोकांमध्ये मद्यपान (Drink and Smoke Side Effects) आणि धूम्रपानाची सवय आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर नियंत्रण आणणे आपल्याच हातात आहे. तेव्हा किडनीच्या आरोग्यासाठी आपल्या आहारातून दारूचे आणि सिगारेटचे व्यसन कमी करणं आवश्यक आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)