महिलांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी... Sanitary Pad की menstrual cup?

 परंतु त्यांच्यापैंकी नक्की काय चांगलं याचा अंदाज कोणालाच येत नाही. 

Updated: Sep 26, 2022, 09:09 PM IST
महिलांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी... Sanitary Pad की  menstrual cup?  title=

Sanritary Pads or Mentrual Cup:  महिलांना नेहमीच सतावणारा प्रश्न म्हणजे सॅनिटरी पँड्स वापरायचे की मेन्स्टुयल कप. (Sanritary Pads or Mentrual Cup) कारण काहींना मेन्स्ट्रुयल कप चांगला वाटतो तर काहींना पॅड. परंतु त्यांच्यापैंकी नक्की काय चांगलं याचा अंदाज कोणालाच येत नाही. (lifestyle tips what to use sanitary pad or mentural tips see the difference benefits for women during periods)

मासिक पाळी मोकळेपणानं चर्चा करायलाही अनेक जणी घाबरतात. त्यामुळे सॅनिटरी वेस्टची समस्या कशी हाताळली जाऊ शकते याबद्दल फारशी माहिती अनेकांना नसते. कापडी पॅड हे पूर्णपणे कापसाचे बनलेले पॅड असतात. हे पॅड सायकलनंतर धुतले जाऊ शकतात आणि नंतर पुन्हा वापरले जाऊ शकतात. मासिक पाळीचे कप हे सिलिकॉनचे बनलेले असतात. (Cotton Pads and Slilicon Cups)

काय वापरायचं? (What to Use)

  • कप हाताळणे खूप सोपे असू शकते कारण त्यांना फक्त रिकामे करावे लागेल आणि नंतर पाण्याने धुवावे लागते. त्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागते. यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि प्रवास करायला कुठे जात असाल तरी काही चिंता नसते .
  • कॉटन पॅड आणि मासिक पाळीचा कप यामधील निवड व्यक्तीवर अवलंबून असते. परंतु सॅनिटरी पॅडपेक्षा तुम्ही कप वापरू शकता. कपचे फायदेही अधिक आहेत. सॅनिटरी पॅड वापरताना कधीकधी दुर्गंध येऊ शकतो. त्यातून डाग लागण्याची चिंता असते किंवा तुमच्या त्वचेलाही त्यांचा वाईट परिणाम होऊ शकतो. 
  • कप्सच्या वापरामुळे दुर्गंध येत नाही कारण यावेळी रक्त शरीरातच राहते, ते हवेच्या संपर्कात येत नाही. तुम्हाला वारंवार पॅड्स बदली करावे लागत नाहीत. मेन्स्ट्रुअल कप्स 11 ते 12 तास वापरले जाऊ शकतात. बहुतेक पॅडमध्ये सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही.
  • मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर करून तुम्ही जिम आणि इतर शारीरिक कामे आरामात करू शकता.
  • मेन्स्ट्रुअल कप्स पॅड किंवा टॅम्पॉनपेक्षा 5 पट अधिक रक्त शोषतात. मेन्स्ट्रुअल कप्स सुरुवातीला वापरणे कठीण आहे, परंतु एकदा का तुम्हाला सवय झाली की तुम्हाला पुन्हा कधीही पॅड वापरावेसे वाटणार नाही.

(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)