कशामुळे बळावतो ओठांचा कॅन्सर ? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको

ओठ हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयांपैकी एक आहे.

Updated: Aug 6, 2018, 06:31 PM IST
कशामुळे बळावतो ओठांचा कॅन्सर ? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको  title=

मुंबई : ओठ हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयांपैकी एक आहे. मात्र आपण ओठांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेकदा ओठांच्या कॅन्सरकडे दुर्लक्ष केले जाते. ओठांच्या कॅन्सरदरम्यान लोकांना खाता-पितानादेखील त्रास होतो. म्हणूनच कॅन्सरचा धोका वेळीच ओळखण्यासाठी या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. केमोथेरपीशिवाय ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य ?

ओठांच्या कॅन्सरची लक्षण - 

ओठांचा कॅन्सर बळावत असल्यास 

- दात कमजोर होतात
-ओठांच्या आजूबाजूच्या भागावर जखम होणं, रक्तस्त्राव होणं
-ओठांवर सूज येणे,  वेदना जाणवणं
-ओठांवर पांढरा स्तर दिसणं
- ओठांचा भाग लालसर होणं
- गळ्याजवळ, तोंडाजवळ वेदना जाणवणं
-आवाजात बदल होणं  

कशामुळे होऊ शकतो ओठांचा कॅन्सर ?

तंबाखू, गुटखा खाणार्‍यांमध्ये ओठांचा कॅन्सर बळावतो 
ओरल सेक्स करणार्‍यांमध्ये 
सूर्यप्रकाशात अधिक दिवस राहणार्‍यांमध्ये, अतिनील किरणांमुळे ओठांचेही नुकसान होऊ शकते 
सिगारेट, हुक्का पिण्याची सवय असणार्‍यांमध्ये