Mango Myths : पहा आंब्याबद्दलच्या काही गैरसमजुती ज्या तुम्हालाही खऱ्या वाटतं असतील

आंब्याच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक समजूती आहेत. 

Updated: Jun 6, 2021, 06:13 PM IST
Mango Myths : पहा आंब्याबद्दलच्या काही गैरसमजुती ज्या तुम्हालाही खऱ्या वाटतं असतील title=

मुंबई : आंबा एखाद्याला आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं जरा मुश्किल आहे. जवळपास प्रत्येकाला फळांचा राजा म्हणजेच आंबा आवडतो. अनेकजण तर केवळ आंबा खाण्यासाठी या ऋतुची वाट पाहतात. आंब्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्वही आहेत. असं आंब्याच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक समजूती आहेत. मात्र यामधील काही समजूती चुकीच्या असून त्याबाबत जाणून घेऊया.

आंबा खाल्ल्याने वजन वाढतं

अनेक जणं ही गोष्ट मानतात की आंबा खाल्ल्याने वजन वाढतं. मात्र आंबा फॅट, सोडियम आणि कोलेस्ट्रॉल फ्री असतो, त्यामुळे आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही. आंब्यामध्ये व्हिटॅमीन ए, सी, बी-६, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसंच डायटरी फायबर असतं. त्यामुळे आंब्याचा सगळ्यात हेल्दी फळांमध्ये समावेश होतो. इतकंत नव्हे तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे फळ खाऊ शकता. 

आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल येतात

आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असतं. अँटीऑक्सिजन शरीरातून टॉक्सिन पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे फ्री रेडिक्लसलाही दूर करतं. शरीरातून विषारी गोष्टी दूर करण्यासाठीही आंब्याचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यामुळे आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल येतात हा एक गैरसमज आहे.

आंबा खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते

आंबा खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते ही गोष्टी पूर्णपणे खरी नाही. आपल्या देशात लोकं आंब्याचं सेवन करण्यापूर्वी त्याला एक तास पाण्यात भिजवतात. यामुळे आंबा खाल्ल्यानंतर शरीराची उष्णता राखण्यास मदत मिळते.

गर्भवती महिलांनी आंब्याचं सेवन करू नये

गर्भवती महिलांना पपई सारख्या पदार्थांचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते. मात्र या यादीमध्ये आंब्याचं नाव नाही. उलट डॉक्टर आंबा खाण्याचा सल्ला देतात. मात्र कोणत्याही पदार्थाप्रमाणे आंब्याचंही अतिसेवन हानिकारक ठरू शकतं.