400 ग्रॅम वजनाच्या मानुषीने जिंकली अस्तित्त्वाची लढाई !

राजस्थानमध्ये एका चमत्काराची अनुभूती डॉक्टरांना आली आहे. पण देव तारी त्याला कोण मारी या नियमानुसार एका नवजात बालिकेने या जगात टिकून राहण्याचा संघर्ष जिंकला आहे. 

Updated: Jan 13, 2018, 01:14 PM IST
400 ग्रॅम वजनाच्या मानुषीने जिंकली अस्तित्त्वाची लढाई !
प्रातिनिधिक फ़ोटो

उदयपूर : राजस्थानमध्ये एका चमत्काराची अनुभूती डॉक्टरांना आली आहे. पण देव तारी त्याला कोण मारी या नियमानुसार एका नवजात बालिकेने या जगात टिकून राहण्याचा संघर्ष जिंकला आहे. 

चॉकलेटच्या वजनाइतकेच केवळ वजन असणार्‍या मुलीने तिच्या अस्तित्त्वाची पहिली लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. 

केवळ 400 ग्रॅम वजनाइतकेच

मानुषीचा जन्म उद्यपूरमध्ये झाला. जन्माला आली तेव्हा मानुषी केवळ 400 ग्रॅँम वजनाची होती. पण आरोग्यशास्त्राला आव्हान देत ती आता सामान्य मुलगी झाली आहे. प्रि-मॅच्युअर बर्थ असल्याने मानुषीचं वजन अत्यल्प म्हणजेच केवळ 400 ग्रॅम होते. 

सहा महिन्यांचा झगडा 

सहा महिने डॉक्टरांनी मानुषीवर मेहनत घेतली. डॉक्टरांच्या मेहनतीला फळदेखील मिळाले. सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर आता मानुषीला घरी पाठवण्यात आले आहे.

मानुषीवर मेहनत घेणार्‍या डॉक्टरांच्या माहितीनुसार मानुषी ही अशाप्रकारे जगणारी भारत आणि साऊथ आशियातील सगळ्यात लहान मुलगी आहे. 

मानुषीपूर्वी रजनी 

मानुषीपूर्वी 2012 साली 450 ग्रॅमची रजनीनेदेखील जीवनाचा संघर्ष जिंकला होता  रजनीचा जन्म मोहालीत झाला होता.  

मानुषीची प्रकृती 

400  ग्रॅम वजनाची मानुषी केवळ 8.6 इंचाची आहे. श्वास घेऊ न शकल्याने मानुषीचा प्रि मॅच्युअर जन्म झाला. मानुषीची फुफ्फुसे, हृद्य, मेंदू, किडनी पुरेशी विकसित झाली नव्हती. कागदाइतकी तिची त्वचा पातळ होती. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close