Microplastic: आईच्या दूधात 'मायक्रोप्लास्टिक'; धक्कादायक माहिती समोर

Microplastics Present in Breast Milk : पॉलिमर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्तनपानाच्या संशोधनात पॉलिथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनचे मायक्रोप्लास्टिक आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.

Updated: Oct 11, 2022, 10:34 AM IST
Microplastic: आईच्या दूधात 'मायक्रोप्लास्टिक'; धक्कादायक माहिती समोर  title=

Microplastics Present in Breast Milk : आई होणे ही जगातली सगळ्यात सुंदर आणि नितळ भावना आहे. आई आपल्या बाळाला दुध पाजते तेव्हा तीच त्याची भुकेची भावना समजून घेऊ शकते. आपल्या आईचे स्तनपान (Breastfeeding) हे बाळाला सुंदर निरोगी व बलवान करण्यासाठी संजीवनी वरदान असून, स्तनपानामुळे भविष्यात बाळाला विविध आजारांपासून संरक्षण मिळते. पण पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात मायक्रोप्लास्टिक (Microplastics) आढळले आहे. अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. 

 इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक (Microplastics) शोधले आहेत. या दुधाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी (scientists), एका 34 वर्षीय आईच्या अनेक चाचण्या घेतल्या. या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दुधात प्लास्टिकचे (Plastic in milk) कण आढळल्याचं शास्त्रज्ञांच्या संशोधनादरम्यान निष्पन्न झालं.

तसेच, अशा परिस्थितीत स्तनपान (breastfeeding) करणं योग्य की, अयोग्य यांसारखे अनेक प्रश्न संशोधकांना पडले आहेत. दुसरीकडे पाहिलं तर, आईच्या दुधाचे नवजात बाळाला (newborn baby) अनेक फायदे आहेत. त्याच्या आरोग्यासाठी आईच दूध एखाद्या नवसंजीवनी प्रमाणेच आहे. त्यामुळे संशोधकांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.  

दरम्यान ज्या आईच्या दूधावर बाळ सुरुवातीचे काही महिने अन्नासाठी अवलंबून असतं, त्याच आईच्या दूधात मायक्रोप्लास्टिक आढळून आल्यानं नवजात बाळांच्या आरोग्याबद्दल शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.   पॉलिमर्स जर्नलमध्ये (Polymers Journal) प्रकाशित झालेल्या स्तन आणि दुधाच्या संशोधनात पॉलीथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनपासून बनविलेले मायक्रोप्लास्टिक्स आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.

2020 मध्ये इटलीमधील टीमनं मानवी प्लेसेंटामध्ये मायक्रोप्लास्टिक्स शोधलं. "आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक्सच्या उपस्थितीचे पुरावे अर्भकांच्या असुरक्षितेबाबत मोठी चिंता वाढवतात", असं इटलीतील अँकोना येथील युनिव्हर्सिटी पॉलिटेक्निका डेले मार्चे येथील डॉ. व्हॅलेंटीना नोटरस्टेफानो यांनी सांगितलं आहे. 

वाचा : पैसे देण्यासाठी Cheque वापरत असाल तर सावधगिरी बाळगा, कारण...

"मागील संशोधनात मानवी पेशी, प्रयोगशाळेतील प्राणी आणि सागरी वन्यजीवांवर मायक्रोप्लास्टिक्सचे विषारी परिणाम दिसून आले आहेत. परंतु, मानवांवर होणारा परिणाम अद्याप अज्ञात आहे. प्लॅस्टिकमध्ये अनेकदा phthalates सारखी हानिकारक रसायनं असतात, जी आता आईच्या दुधात आढळून आली आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर असून अत्यंत चिंताजनक आहे."

संशोधकांनी सांगितलं की, गरोदर असताना महिला प्लास्टिकमध्ये पॅक करण्यात आलेले पदार्थ, पेय आणि सीफूड्सचं (Seafood) यांचं सेवन करतात. त्यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेसाठी प्लास्टिकयुक्त उत्पादनांचा वापर करतात. याचा मायक्रोप्लास्टिकच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नाही. पुढे बोलताना संशोधकांनी सांगितलं की, हे मायक्रोप्लास्टिकच्या सर्वव्यापी उपस्थितीकडे निर्देश करतं.