मुंबई : सनस्क्रीन न लावता अधिकवेळ उन्हात फिरल्यास त्वचा काळवंडण्याला सुरूवात होते. उन्हाळ्याच्या दिवसात हा त्रास अधिक प्रकर्षाने वाढते. उन्हात घाम येण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे चेहर्यावरील टिश्युज मोकळे होत नाहीत. परिणामी रंग हळूहळू सावळा होण्यास सुरूवात होते. त्वचेची काळजी घेताना काही गोष्टीचे भान ठेवल्यास हा सावळेपणा कमी होण्यास मदत होते. मग पहा काळंवडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी कशी ठरते फायदेशीर?
त्वचेवर तुम्हांला मुरूम, डाग, ब्रेकआऊट्सचा त्रास असल्यास हळूहळू त्वचा जाडसर आणि काळसर होण्यास सुरूवात होते.
व्हिटॅमिन ए, सी, बी च्या कमतरतेमुळे त्वचेमध्ये रूक्षपणा वाढतो. यामुळे सावळेपणा वाढण्याची शक्यता बळावते.
यकृताशी निगडीत काही समस्या असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. यामुळेही त्वचा काळवंडू शकते.
शरीरात हार्मोनल बदल झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. यामुळे सावळेपणा वाढतो.
उन्हात अधिकवेळ राहिल्यासही त्वचा काळवंडू शकते.
काळ्या चहाच्या पाण्यात कापसाचा बोळा भिजवून त्वचेवर फिरवा. यामुळे रंग उजळतो. काळा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
चेहर्यावर ताजा कोरफडीचा गर लावल्यास त्वचा तजेलदार होते. कोरफडीचा गर लावल्यानंतर त्याला काही वेळ सुकू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. कोरफडीचा रस पिणेदेखील त्वचेच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
नारळाचं पाणी कापसाच्या बोळ्याने चेहर्याला लावा. दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. नारळाच्या पाण्याच्या बाहेरील वापाराप्रमाणेच त्याचे सेवनदेखील तजेलदारपणा सुधारण्यास मदत करतात.
लिंबाचा रस गुलाबपाण्यसोबत मिसळून चेहर्यावर लावल्यास त्वचा अधिक चमकदार होते. त्वचेवर हे मिश्रण सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होतात. सोबतच तजेलदारपणा वाढतो.