मुंबई : घरात एक ढेकूण घुसले तर अल्पावधीतच त्यांची फौज तयार होण्यास काही वेळ लागत नाही. ढेकूण रात्रीच्या वेळेस अत्यंत त्रासदायक ठरतात. ढेकूण चावल्यानंतर अंगावर लाल चट्टे उठतात. झोपमोड करणारे आणि त्वचेचे नुकसान करणार्या ढेकूणांचा त्रास कमी करायचा असेल तर घरात नियमित पेस्ट कंट्रोल करणं हा एक उपाय आहे. मात्र हा उपाय केमिकलयुक्त असल्याने अनेकांना त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. म्हणूनच केमिकल फ्री पर्यायांनी ढेकणांना घराबाहेर काढण्यासाठी हे सुरक्षित उपाय नक्की आजमावून पहाच.
ढेकूण पुदीनच्या वासाने दूर जातात. त्यांना पुदीन्याचा वास असह्य होतो. तुमच्या अंथरूणाजवळ पुदीन्याची ताजी पानं पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदीन्याची पानं ठेवू शकता. पुदीन्याची पानं चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण तुमच्यापासून लांब राहू शकतात.
सर्दी-पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकूणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगीरी फायदेशीर आहे. तुम्हांला ढेकूण दिसल्यास त्यावर काही थेंब निगगिरीचे थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. सोबतच रोजमेरी, लॅवेंडर यासोबत निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करू शकता.
कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. सोबतच कडूलिंबातील अॅन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. थेट ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिकडाव करा. नियमित या प्रयोगामुळे अवघ्या आठवड्याभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. सोबतच कपडे धुतानाही डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.
पुदीन्याप्रमाणेच लॅवेंडरचा वासही ढेकणांना सहन होत नाही. ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. त्यांना कपड्यांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात.
टी ट्री ऑइलमध्ये अॅन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकूणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. या स्प्रेचा वापर करून भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकूणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकूणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
ढेकणांंप्रमाणेच झुरळांंना घराबाहेर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील 'हा'च पदार्थ ठरणार फायदेशीर आणि ५ घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर