Omicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा

Omicron damange Lungs? तज्ज्ञांकडून मोठा खुलासा 

Updated: Jan 3, 2022, 06:35 AM IST
Omicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा  title=

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रूग्ण जगभरात सापडत आहेत. असं असताना आता कोरोनाच्या रूग्णसंख्येतही वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी 8 हजाराहून अधिक कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. तर 50 हून अधिक रूग्ण ओमायक्रॉनचे सापडले आहेत. 

कोरोनाचा शरीरावर मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे फुफ्फुसावर मोठा आघात झाला. असं असताना आता नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन मानवी शरीरावर किती परिणाम करतो? याबाबत प्रश्न होते. 

याबाबत अभ्यासात मोठा खुलासा झाला आहे. ओमायक्रॉन कोरोनाच्या तुलनेत गंभीर नाही. फुफ्फुसावर याचा तितका परिणाम होत नाही. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, हॅम्स्टर्स आणि उंदरांवर अमेरिका आणि जपानच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार ओमायक्रॉनचा संक्रमित लोकांवर फार परिणाम होत नाही. 

अहवालात असे म्हटले आहे की, ओमाक्रॉनचा संसर्ग झालेल्या उंदरांच्या फुफ्फुसांमध्ये इतर प्रकारांपेक्षा एक दशांश कमी विषाणू होते. हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी ओमायक्रॉन पीडितांमधील मानवी ऊतींचा अभ्यास केला.

अहवालात असे म्हटले आहे की विषाणूच्या पूर्वीच्या स्ट्रेनच्या तुलनेत, 12 फुफ्फुसांच्या नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन खूप हळूहळू वाढला.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांचे असे मत आहे की सुपर म्युटंट प्रकार फुफ्फुसाच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात आढळत नाही, म्हणजेच त्यामुळे कमी नुकसान होते.

दक्षिण आफ्रिकेतील डेटावरून असे दिसून आले आहे की डेल्टा असलेल्या रुग्णांपेक्षा ओमायक्रॉनमुळे कमी बळी गेले आहेत. हा आकडा 80 टक्के कमी आहे. 

तसेच यूके हेल्थ अँड सेफ्टीच्या तत्सम अभ्यासानुसार ओमायक्रॉनची जोखीम 70 टक्के कमी असल्याचा अंदाज आहे.

बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे कॉम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट रोलँड इल्स म्हणाले की, संशोधनात असे कळले आहे की, कोरोनाचा ओमायक्रॉन हा प्रकार फुफ्फुसांच्या बाहेर राहतो. त्यामुळे ओमायक्रॉनचा फुफ्फुसाला तसा धोका नाही. 

मात्र या सगळ्या प्रकारात कोरोनाचे रूग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे.