उन्हाळ्यासाठी घरच्या घरी बनवा कूल कूल सरबत...

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा. 

Updated: Apr 3, 2018, 12:04 PM IST
उन्हाळ्यासाठी घरच्या घरी बनवा कूल कूल सरबत... title=

मुंबई : उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा. 

फळांचे सरबत :- १ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू

कृती:- सर्वांचा रस काढून घ्या. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्या. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयत्यावेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते. त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.

खस सरबत :- साखर आणि पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या. थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इन्सेस आणि रंग घाला. पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.

अननसाची लस्सी 

साहित्य :- ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, वेलची पूड, किंचित साखर
कृती :- अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .

कैरीचे पन्हे :
कैरीची साले काढून किसून घ्या. थंड पाण्यात कुस्करून गाळून घ्या. त्यात साखर वेलचीपूड टाका. किंचित मीठ आणि बर्फ घालून प्यायला द्या

चिंचेचे सरबत !
वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी आणि चिंच काढून घ्यावी. चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप आणि जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.