हेअर प्रॉब्लेम्सना करा कायमचं गुडबाय..ताबडतोब करा हे उपाय

जास्त ह्युमिडिटी आणि ड्रायनेसमुळे केसांची समस्या निर्माण होते. पावसाचं पाणी हे प्रदूषित असतं,यामुळे केसांचं खूप नुकसान होतं

Updated: Jul 22, 2022, 12:04 PM IST
हेअर प्रॉब्लेम्सना करा कायमचं गुडबाय..ताबडतोब करा हे उपाय  title=

Trending news: जास्त ह्युमिडिटी आणि ड्रायनेसमुळे केसांची समस्या निर्माण होते. यामुळे केसांचं नुकसान होतं. वाढत्या वयात केसांची समस्या अटळ आहे, पण तरुण वयात केसांची समस्या ही चिंतेची बाब आहे. यासाठी पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या.

बदलती जीवनशैली ठरतेय घातक

सुंदर केस तुमचं सौंदर्य आणखी वाढवण्यात भर घालतात .सुंदर लांबसडक आणि हेल्थी केस कोणाला नको असतील? पण धावती जीवनशैली ,प्रदूषण आपण वापरत असेललेले हेअर प्रॉडक्ट्स,ताण-तणाव या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या केसांवर होत असतो आणि मग केस खराब होणं,गळणं ,ड्राय होणं यासारख्या असंख्य समस्या मागे लागतात. मात्र आपण समस्या उद्भवल्यानंतर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो पण या समस्या होऊच नयेत यासाठी आपण आधीपासूनच काळजी घेतली तर आपण पुढे होणाऱ्या केसांच्या समस्येला थांबवू शकता. वाढत्या वयात केसांची समस्या अटळ आहे, पण तरुण वयात केसांची समस्या ही चिंतेची बाब आहे. 

पावसाळा सुरू झाल्याने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.  पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, झिका सारखे आजार डोकं वर काढतात. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकला, सर्दी, व्हायरल फ्लू आणि केसांच्या समस्याही होतात. जास्त ह्युमिडिटी आणि ड्रायनेसमुळे केसांची समस्या निर्माण होते. यामुळे केसांचं नुकसान होतं. तुम्हालाही पावसाळ्यात केसांची काळजी घ्यायची असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा.  

जाणून घेऊया पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी. 

सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पावसाचं पाणी हे प्रदूषित असतं, यामुळे केसांचं खूप नुकसान होतं. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर घरी पोहोचताच स्वच्छ पाण्याने केस धुवा.

पावसाळ्यात केस चांगल्या दर्जाच्या शाम्पूने धुवा. प्रोटीन आणि केराटिन असलेल्या शाम्पूने आपले केस धुवा. यामुळे केस चांगल्या प्रकारे स्वच्छ होतील. तसेच केस गळणे देखील कमी होईल.

केसांना कंडिशनिंग लावण्याची खात्री करा.

यामुळे केस हायड्रेट राहतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हेअर मास्क देखील वापरू शकता. यासाठी तुम्ही प्रोटीन आणि केराटिन युक्त कंडिशनिंग वापरू शकता. याशिवाय खोबरेल तेलही वापरू शकता.

केसांना मसाज करणे आवश्यक आहे. 

केसांना नियमित मसाज करणे आवश्यक आहे. यामुळे केसांना पूर्ण पोषण मिळते.  यासाठी केसांना आणि टाळूला खोबरेल तेल लावा. यानंतर केसांना हलक्या हातांनी मसाज करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीही केसांना मसाज करू शकता.यांमुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल.