कोरोना लस घेतल्यानंतर असा होतोय गंभीर साईड इफेक्ट?

लसीकरणानंतर अनेकांमध्ये विविध साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत.

Updated: Jul 23, 2021, 11:19 AM IST
कोरोना लस घेतल्यानंतर असा होतोय गंभीर साईड इफेक्ट? title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. मात्र लसीकरणानंतर अनेकांमध्ये विविध साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत. भारतात देखील लसीकरणानंतर हात दुखणं, ताप तसंच सुस्ती सारखे साईड इफेक्ट्स पहायला मिळालेत. मात्र यामध्ये आता अजून एक साईड इफेक्ट समोर आला आहे. 

लस घेतलेल्या लोकांमध्ये एंक्जायटी दिसत असल्याचं समोर आलं आहे. मात्र हा साईड इफेक्ट तात्पुरता आहे आणि असं म्हणतात की, लस घेतल्यानंतर असा प्रभाव पडणं सामान्य आहे. तसंच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस हा एक सर्वात प्रभावी मार्ग आहे.

सरकारी पॅनलच्या एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कोरोना लस घेतल्यानंतर समोर आलेल्या गंभीर प्रतिकूल प्रकरणांमध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक केस या एंक्जायटीशी निगडीत होत्या. नॅशनल एडवर्स इवेंट्स फॉलोविंग इम्युनाइजेशन कमिटीने लसीकरणानंतर 60 गंभीर प्रकरणांच्या अभ्यास केला. यामध्ये 36 प्रकरणांमध्ये लोकांना एंक्जायटी असल्याचं समोर आलं. हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक होतं.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, एंक्जायटीसंबंधी अधिकतर प्रकरणं ही महिलांमध्ये पहायला मिळाली आहेत. यामध्ये सुईची भीती तसंच लसीसंदर्भात संकोच अशा गोष्टींचा समावेश आहे. महिलांमध्ये सुईची भीती जास्त पहायला मिळाली असून ही भीती कशी दूर करायची यावर आम्हाला विचार करावा लागणार आहे.

विचारविनिमय आणि संपूर्ण आढावा घेतल्यानंतर, राष्ट्रीय एईएफआय समितीच्या मंजुरीनंतर हा अहवाल 27 मे रोजी पूर्ण झाला. दरम्यान 8 जुलै रोजी हा आरोग्य मंत्रालयाकडे सोपवण्यात आला. कोरोना लसीकरणानंतर कॅजुअल्टी असेसमेंटसाठी आरोग्य मंत्रालयाने एक समिती गठीत केली होती. यामध्ये कार्डियोलॉजीस्ट, न्यूरोलॉजीस्ट, मेडिकल स्पेशालिस्ट तसंच गायनॅकोलॉजीस्टचा समावेश होता.