Sexual Health : शरीर संबंधानंतर लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं?

शारीरिक संबंधानंतर नेमकं कोणत्या ७ गोष्टी आवर्जून कराव्यात, ज्याचा नक्की फायदा होतो

Updated: Feb 9, 2022, 08:34 PM IST
Sexual Health : शरीर संबंधानंतर लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं? title=

मुंबई : निरोगी आणि सुरक्षित सेक्ससाठी खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. काही गोष्टी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पती-पत्नीचं नातं अधिक खुलण्यासाठी शारीरिक संबंध खूप महत्वाची भूमिका साकारत असतं. तसेच या गोष्टी लक्षात घेऊन नातेसंबंध तयार केले तर तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. (Sexual Health Passing Urine after physical relation is good for women ) 

भारतासारख्या देशात आजही सेक्सबद्दल (Sexual Health) हळू आणि दबक्या आवाजात बोलले जाते. त्यामुळे लैंगिक आजार असो किंवा इतर लैंगिक समस्या याबद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही. बहुतेक लोकांना शारीरिक संबंधांबद्दल माहिती नसते, अशा परिस्थितीत ते आरोग्य समस्यांचा धोका पत्करतात.

सेक्स हा जितका शारीरिक व्यायाम आहे तितकाच तो मानसिक क्रिया आहे. याचा अर्थ तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे गैरसमज न बाळगता काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. 

शारिरीक संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं 

शारीरिक संबंध झाल्यानंतर लगेच लघवी करणे आवश्यक आहे. लघवी केल्याने बॅक्टेरिया आणि जंतू मूत्रमार्गातून बाहेर पडता. ज्यामुळे संसर्गाचा धोका नाहीसा होतो.

जर तुम्ही लघवी करत असाल तर तुम्हाला UTI चा धोकाही कमी होऊ शकतो. समागमानंतर लघवी करणे विशेषतः स्त्रियांसाठी महत्वाचे आहे, कारण यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. पण पुरुषांनीही तसे करण्यात काही नुकसान नाही.

योनी साफ ठेवावी 

समागमानंतर महिलांनी त्यांची योनी स्वच्छ करावी. असे केल्याने तुम्ही लैंगिक आजारांपासून दूर राहू शकता.

हात स्वच्छ धुवा

वॉशरूममध्ये गेल्यानंतर हे करण्यास कुणी विसरत नाही, परंतु हे नमूद करणे आवश्यक आहे कारण ते तुमच्या पोस्ट सेक्स रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.

पाणी प्या 

सेक्स हा व्यायाम म्हणून गणला जातो, म्हणून एक कप पाणी पिण्याने केवळ तुमची शक्ती भरून काढण्यास मदत होते. तुमच्या मूत्रमार्गात असलेले बॅक्टेरिया बाहेर काढून टाकण्यास देखील मदत होते. त्यामुळे एक कप पाणी प्यावे. 

सैल कपडे परिधान करा

शारीरिक संबंधानंतर तुम्ही सैल कपडे घालणे फायदेशीर असते. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर तुम्हाला मोकळं वाटू शकतं. 

फोन आणि डिव्‍हाइस दूर ठेवा 

शारीरिक संबंधानंतर प्रत्येकाला आराम करायचा असतो.  त्यामुळे फोन किंवा इतर डिव्‍हाइस स्वतःपासून दूर ठेवा कारण असे केल्‍याने तुम्‍हाला चांगली झोप येते. 

संसर्गाच्या लक्षणांकडे लक्ष द्या

तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मूलभूत स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर घामामुळे तुम्ही यीस्ट इन्फेक्शनला बळी पडू शकता.

तुमच्या प्रायव्हेट पार्टमधून काही खाज सुटणे, लालसरपणा, वेदना, सूज, पुरळ किंवा स्त्राव होत असल्याचे तुम्हाला आढळल्यास, त्यावर लवकरात लवकर उपचार करणे चांगले. संसर्गामुळे प्रत्यक्षात कायमस्वरूपी नुकसान होत नाही.