या ५ गोष्टींमुळे अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात!

अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे चटकन आकर्षित होतात. 

Updated: May 3, 2018, 10:24 AM IST
या ५ गोष्टींमुळे अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात! title=

मुंबई : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे चटकन आकर्षित होतात. अशावेळी लग्न न झालेल्या मुलांना प्रश्न पडतो की, त्यांच्याकडे असे काय आहे जे आमच्याकडे नाही? पण हा प्रश्न फक्त मुलांनाच पडतो असे नाही तर अनेकांना मुलींचे असे वागणे अचंबित करते. पण आता या प्रश्नाचे उत्तर एका अभ्यासातून पुढे आले आहे. विवाहीत पुरुषांमधील या काही गोष्टी मुलींना खूप भावतात आणि त्यामुळेच त्या त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी?

मॅच्यूरीटी

विवाहीत पुरुष हे अविवाहीत मुलांच्या तुलनेत अधिक मॅच्यूअर असतात. मुलींना वेळोवेळी, गरज असताना मार्गदर्शन करणारे पुरुष आवडतात. 

आर्थिकदृष्ट्या सबळ

विवाहीत पुरुष आर्थिकदृष्ट्या सबळ असतात. मुली नेहमी भविष्याबद्दल चिंतित असतात. अशावेळी आयुष्यात पूर्वीपासूनच आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या व्यक्ती असावा, अशी त्यांची इच्छा असते.

इंप्रेस करण्याची पद्धत

पार्टनरला इंप्रेस करणे विवाहीत पुरुषांनी अगदी सहज जमते. त्यामुळे मुलींचे विवाहीत पुरुषांकडे आकर्षित होण्याचे हे मोठे कारण आहे. मुलींचे मन कसे जिंकायचे हे विवाहीत पुरुषांना एकदम परफेक्ट माहित असते.

करिअर

विवाहीत पुरुषांचे करिअर आधीपासूनच उत्तम असते. पुढीची फारशी चिंता त्यांना नसते. त्यांच्याकडे पार्टनरला देण्यासाठी पूर्ण वेळ असतो.

केअरिंग

विवाहीत पुरुषांमध्ये केअर करण्याची भावना, सवय निर्माण झालेली असते. काहीही बोलताना ते नेहमी पार्टनरच्या भावनांचा विचार करतात. त्यांच्यातील हा गुण कोणाला भावणार नाही.