या '7' वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका !

काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. 

Updated: Jun 5, 2018, 09:06 AM IST
या '7' वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका !  title=

मुंबई : काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. फ्रीजमध्ये वस्तू ठेवल्याने ती अधिक दिवस टिकून राहते असे तुम्हांला वाटू शकते. मात्र तुमची ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. म्हणून या वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक मूळीच करू नका. 

कॉफी  - 

पावसाळ्याच्या दिवसात गरम कॉफी पिण्याचा आनंद काही औरच असतो. परंतू अधिक दिवस कॉफी टिकावी म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. फ्रीजमध्ये कॉफी ठेवल्याने दुसर्‍या पदार्थांचा वास कॉफीला येतो आणि कॉफी खराब होऊ शकते. 

मध - 

मध फ्रीजमध्ये साठवू नका. मध सामान्य रूम टेम्परेचरमध्येचा उत्तम राहते. फ्रीजमध्ये मध ठेवल्यास त्याचे क्रिस्टल होऊ शकतात. 

लोणचं -  

बाजारात विकत मिळाणार्‍या विकतच्या लोणच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. व्हिनेगरयुक्त पदार्थ फ्रीजमध्ये साठवल्यास खराब होतात.  त्यासोबत इतर पदार्थदेखील खराब होतात.  

केळं - 

केळं फ्रीजमध्ये साठवू नये. यामुळे ते काळं पडण्याची दाट शक्यता असते. यामधील ईथाईलीन घटक बाहेर पडतात. हा एक प्रकारचा गॅस असून त्यामुळे आजुबाजूची फळंदेखील खराब होऊ शकतात. 

टोमॅटो - 

फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवू नयेत. यामुळे ते खूप लवकर मऊ होतात. सोबतच त्याची चवदेखील उतरते.  टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी खास टीप्स

बटाटा -

बटाट्यामध्ये स्टार्च शुगर असल्याने फ्रीजमध्ये ते अधिक दिवस ठेवल्याने चव खराब होण्याची शक्यता असते.  

आंबट फळं - 

संत्र,लिंबू, मोसंबी यासारखी आंबट फळं टाळा. फ्रीजमध्ये ही फळं खराब होतात, सुकतात